देश-विदेशमुंबई 

‘नॉर्थइस्ट ऑन व्हील्स’ साठी भारत तयार

मुंबई :
ईशान्य भारतातील सौंदर्य तसेच विविध घटकांची माहिती प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने द न्यु एक्स्पिडिशन (नॉर्थ इस्ट ऑन व्हील्स) ची सुरूवात आज नवी दिल्लीत करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून भारत सरकारच्या संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री  मिनाक्षी लेखी जी उपस्थित होत्या, त्यांच्या सोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतातून आलेले ७५बायकर्स या प्रवासात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन अमेझिंग नमस्ते फाऊन्डेशन तर्फे करण्यात आले आहे. या मोहिमेची सुरूवात ही ८ एप्रिल २०२२ रोजी आसाम मधील गुवाहटी येथून होणार असून या अंतर्गत ८ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण देशभरांतून आलेले रायडर्स हे १४०० ‍किमीचा प्रवास करून ईशान्ये कडील विविध राज्यांमधून प्रवास करणार आहेत. या प्रवासादरम्यान रायडर्स ना ईशान्येकडील संस्कृती बरोबर त्यांची जीवनशैली, त्यांच्या खाद्यसवयी आणि अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल.

 

या कार्यक्रमाचे आयोजक अमेझिंग नमस्ते फाऊन्डेशन चे अध्यक्ष अतूल कुलकर्णी यांनी सांगितले,“ईशान्य भारतातील प्रदेश हा माझ्या हृदयाच्या जवळचा असा प्रदेश आहे आणि या प्रदेशाने मला खूपच आश्चर्यकारक गोष्टी दिल्या आहेत. या प्रदेशाचे सौंदर्य पाहणे म्हणजे एक अनोखा अनुभव घेण्याची अनोखी संधी आहे आणि म्हणूनच आम्ही ईशान्य भारतातील ही मोहिम आम्ही गाडीतून करण्याचे ठरवले आहे. नॉर्थ इस्ट ऑन व्हील्स च्या माध्यमातून आम्ही लोकांना आयुष्यभराचा अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

भारत सरकारच्या संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी सांगितले,“नॉर्थ इस्ट ऑन व्हील्स ही केवळ एक मोहिम नव्हे तर एक असा प्रवास आहे ज्यामध्ये आपण त्या प्रदेशा विषयी जाणून घेऊ शकतो. अगदी काही थोडक्या महत्त्वपूर्ण गोष्टी आणि परंपरां व्यतिरिक्त ईशान्येकडे खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाही. नॉर्थ इस्ट ऑन व्हील्स च्या माध्यमातून मला असा संदेश द्यायचा आहे की यामुळे या प्रवासात लोकांना जीवनातील सर्वोत्कृष्ट अनुभव प्राप्त होऊ शकेल. मला खात्री आहे की अशा काही अनोख्या उपक्रमामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन हा भागही सक्षम होऊ शकेल. माननीय पंतप्रधानांनी देखो अपना देश ची हाक ही स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्यासाठी दिली असून यातून याचा लाभ आता ईशान्य भारताला होईल अशी खात्री आहे.”

या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना अशा ठिकाणांना भेटी देणे शक्य होणार आहे ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व सुध्दा आहे. यामध्ये जोवाई, मोईरांग, इम्फाळ, कोहिमा, बुमला पास, तेजपुर इत्यादींचा समावेश आहे. सहभागी लोकांना राष्ट्रीय हिरोज जसे रानी माँ गाईदिनलिऊ, कियांग नानबाग, नेताजी सुभाषचंद्र बोस, कनकलता, जसवंत सिंग आणि अन्य लोकांच्या स्थळांनाही भेट देता येणार आहे. या कार्यक्रमाची सुरूवात करतांना ‘निकल पडे’ म्हणजेच ‘प्रवासाला सुरूवात-मोहिम’ या गाण्याचे ही अनावरण करण्यात आले यामध्ये भारतातील तरूण हे भविष्यातील नेतृत्त्वासाठी तयार आहेत हे दर्शवण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: