google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘मोदींच्या राजवटीत लोकांचा एसबीआयवरचा विश्वास उडाला’

मडगाव :

इलेक्टोरल बॉण्ड्सवर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लोकांचा विश्वास गमावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत एसबीआय बॅंकेत आपल्या ठेवी आणि लॉकर्स असलेल्या नागरिकांना बॅंकेवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी जूनमध्ये सत्तेवर आल्यानंतर एसबीआयवर जनतेचा विश्वास पुर्नस्थापीत करेल, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.


स्टेट बँक ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टात राजकीय पक्षांशी निवडणूक रोखे देणगीदारांची जुळवाजुळव करण्यासाठी जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे कारण देत आणि माहिती सादर करण्यासाठी जून अखेरपर्यंत वेळ मागितला होता. सुप्रीम कोर्टाने वेळ वाढवण्यास नकार दिल्यानंतर त्याच एसबीआयने अवघ्या आठवड्याभरात सर्व डेटा सादर केला, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.


निवडणूक रोखे प्रकरणात भारतातील बँकांसह  सर्व स्वायत्त संस्थांवर मोदी सरकारचे हुकूमशाही नियंत्रण पूर्णपणे उघड झाले आहे. बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवलेल्या ठेवी आणि मौल्यवान वस्तूंची सुरक्षा आणि सुरक्षितता यावर आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असे अमित पाटकर म्हणाले.


श्रीमंत समर्थक आणि गरीब विरोधी भाजप सरकार भाजपला निधी देणाऱ्या क्रोनी कॅपिटलिस्टच्या हाती सर्व काही सोपवत आहे, हे भारतातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे आणि मौल्यवान वस्तूंवर सरकार कधीही कब्जा करु शकते, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.


काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी जून 2024 मध्ये सत्तेवर आल्यानंतर बँकांसह सर्व संस्थांना संपूर्ण स्वायत्तता देईल. काँग्रेस सरकारनेच भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते, याची आठवण अमित पाटकर यांनी करुन दिली आहे.


गोमंतकीयांनी श्रीमंत आणि धनाड्य लोकांना प्रोत्साहन देण्याचा भाजपचा छुपा अजेंडा लक्षात घेणे गरजेचे आहे. मोदी आणि सावंत यांच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारांना आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवणे अत्यंत महत्वाचे आहे, असे अमित पाटकर यांनी म्हटले  केले.

..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!