गोवा 

‘मुख्यमंत्र्यांमुळेच मिळत नाही गोव्याला पुरेसा ऑक्सिजन’

आम आदमी पक्षाने केला डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आरोप

पणजी :

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे धाडस नसल्यामुळेच सध्या राज्यात ​रुग्णांना ​पुरेसे ऑक्सिजन ​मिळत नाही, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. गोव्याचा ऑक्सिजन कोटा वाढवण्यासाठी सावंत सरकारने मोदी सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत SOS ची मागणी करावी अशी आपची सुरुवातीपासूनच भूमिका ​असल्याचे ​पक्षाचे ​राज्य संयोजक राहुल ​​म्हांबरे ​यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. ​

“गोवा स्वतः ऑक्सिजन तयार करीत नाही आणि ऑक्सिजनसाठी संपूर्णपणे शेजारच्या राज्यांवर अवलंबून आहे. राज्या-राज्यांमधील ऑक्सिजन वितरण हे केंद्र सरकारच्या संपूर्ण नियंत्रणाखाली आहे, त्यामुळे गोव्यात असलेली ऑक्सिजनची कमतरता हे थेट मोदी सरकारचे अपयश आहे. मुख्यमंत्री  सावंत हे केंद्राकडे SOS ची मागणी पूर्णपणे टाळत आहेत कारण त्यांना माहीत आहे की यामुळे आपले अपयश उघडे पडेल आणि त्यामुळे मोदींना खाली पहावे लागेल. मुख्यमंत्र्यांच्या या वृत्तीमुळेच ते केंद्राशी धीटपणे व्यवहार करत नाही त्यामुळे गोव्याच्या रूग्णालयात अनावश्यकपणे लोक मरत आहेत. याला तेच कारणीभूत असल्याचा आरोपही ​म्हांबरे ​यांनी केला.

म्हांबरे म्हणाले की,” याविषयी उच्च न्यायालयाने देखील आपच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे मात्र तरीदेखील ऑक्सिजनच्या कमतरतेकडे अद्याप लक्ष दिले गेले नाही.”

“काल रात्री  जीएमसीच्या एकापेक्षा अधिक कोविड वॉर्डात ऑक्सिजनची पातळी पुन्हा धोकादायक पातळीवर आली.  यावरून लक्षात येते की, “जीएमसी डीन ते आरोग्य सचिव ते आरोग्य मंत्री ते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत  प्रत्येकजण केवळ खो-खो देत आहेत व जबाबदारी पासून पळत आहे. मात्र यापैकी कोणीही स्पष्टपणे हे कबूल करत नाही की, गोव्यात आवश्यकतेनुसार पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नाही, म्हणून मुख्यमंत्री जोपर्यंत केंद्राकडून ऑक्सिजनच्या योग्य पुरवठ्याची मागणी करत नाही तोपर्यंत सिलिंडर, ट्रॉली, टाक्या इत्यादींविषयीची सर्व चर्चा निष्फळ आहेत ”, असे म्हांबरे म्हणाले.

goa aap
राहुल ​​म्हांबरे ​

“एकीकडे शेकडो गोयंकर मरत असताना आपण देखील दिल्लीप्रमाणे दोन आठवडे कोर्टाची वाट पहावी का?  कोर्टाची कार्यवाही सुरू राहू द्या, परंतु सीएम सावंत यांच्याकडे त्वरित केंद्राकडे SOS ची मागणी करण्याचे धैर्य नाहीत का?  अरविंद केजरीवाल यांच्याकडून शिकण्यास जर त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी भाजपचेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून शिकावे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केंद्राने कर्नाटकचा कोटा 300 मेट्रिक टनांवरून 1200 मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यासाठी सातत्याने आणि धीटपणाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि यात यश मिळविले.

गोयंकरांसाठी लढा देण्याऐवजी आणि गोव्याचा कोटा वाढवण्याऐवजी सावंत मात्र अन्य राज्यात ऑक्सिजन पाठवण्याचे काम करत असल्याची खंत म्हांबरे यांनी व्यक्त केली.  ऑक्सिजन वितरण केंद्र सरकारद्वारे नियंत्रित होत असल्याने सावंत यांना अशी बांधिलकी दाखविण्याचे कुठलेही अधिकार नसल्याचे म्हांबरे म्हणाले.  म्हांबरे यांनी असा दावा केला की, हा सर्व प्रकार सिद्ध करतो की, म्हादेई, कोळसा प्रश्न किंवा मोलेच्या मुद्द्यांप्रमाणेच, राज्यातील सावंत सरकार दिल्लीच्या भाजपा हायकमांडच्या स्वार्थासमोर गोव्याच्या हिताची तडजोडी करत असल्याचा आरोप म्हांबरे ​यांनी यावेळी केला. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: