गोवा 

‘मुख्यमंत्र्यांची ती घोषणा निवडणूक जुमलाच?’

कोविड लसीकरणावरून 'आप'ची सरकारवर थेट टीका 

पणजी :
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या ठीक एक दिवस आधी गोयंकरांना मोफत लस देण्याची मोठी घोषणा केली होती, परंतु ती घोषणा एक निवडणूक जुमलाच ठरली. सरकारने मोफत लस दिली तर नाहीच शिवाय अद्याप लसीकरण मोहीमदेखील सुरू केलेली नाही, खासकरुन 18-45 वर्षे वयोगटातील व्यक्ती जी कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते मात्र त्यांना लसीकरणासाठी खासगी रुग्णालयात जाण्यास भाग पाडले जात असल्याची टीका आपचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
राहुल  म्हांबरे यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप आणि कोविन पोर्टलवर येणाऱ्या विविध तांत्रिक समस्यांवर प्रकाश टाकला आणि सावंत यांनी गोयंकरांसाठी ही लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी व जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली. आरोग्य सेवा संचालनालयाकडे डीडीएसवाय (DDSY) अंतर्गत नोंदणीकृत लोकांचा डेटाबेस आहेत. आणि या आरोग्य सेवा संचालनालय आणि गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड येथे उपलब्ध डीडीएसवाय योजनेच्या डेटाबेसच्या माहितीचा वापर करून प्रथम 35 ते 45, नंतर 25 ते 35,  आणि शेवटी  18-25 या वयोगटातील व्यक्तिंना कॉल करून त्यांच्या लसीकरणाची दिनांक, वेळ आणि स्थान माहिती देण्यात यावी. जेणेकरून सुलभता यात येईल, असे सुचवले आहे.
म्हांबरे यांनी सांगितले की, दिल्लीतील आप सरकारने आजपासून 18+ वयोगटापुढील व्यक्तींची लसीकरण मोहीम सुरू केली असून गर्दी रोखण्यासाठी लसीकरण होत असलेल्या नियमित रुग्णालयांव्यतिरिक्त 75 हून अधिक शाळांमध्ये नवी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. त्या धर्तीवर गोव्यातदेखील लसीकरण झाले पाहिजे असे नमूद केले.
aapयाव्यतिरिक्त म्हांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या आमदारांना व राजकीय पक्षांना सोबत घेऊन लसीकरण  मोहीमेबद्दल जनजागृती करावी व लोकांमध्ये लसीकरणाविषयी विश्वासाचे वातावरण तयार करावे सुरू करावी.  मुख्यमंत्र्यांनी गोयंकरांच्या हितासाठी आपल्या खुर्चीचा वापर करत जास्तीस्त जास्त लसीच्या कुप्या  खरेदी कराव्यात, असे म्हांबरे म्हणाले.
गोव्याच्या संपूर्ण खेड्यात लसीकरण शिबिरे घेण्यात यावी. आणि लसीकरण शिबिरे हे आरोग्य केंद्र किंवा कोविड केंद्राऐवजी  सामाजिक सभागृहात आयोजित केले जावेत. कारण लोकांना आरोग्य केंद्रांमध्ये जायची भीती वाटते कारण त्याच ठिकाणी कोव्हिड चाचण्या घेतल्या जातात. कोविड चाचणीची किंमत कमी करण्याच्या पक्षाच्या मागणीचीही पुन्हा आठवण करून देताना म्हांबरे म्हणाले की, आधीच लॉकडाऊन मुळे तसेच महागड्या लसीच्या किंमतीमुळे  जनतेची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असून त्यात कोविड चाचणीच्या खर्चाचा भर नको.
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!