गोवा 

‘भंडारी समाजाचा गोव्याचा मुख्यमंत्री चेहरा’

पणजी :


आप ने गुरुवारी आगामी विधानसभा निवडणुकीत भंडारी समाजाचा गोव्याचा मुख्यमंत्री आणि कॅथलिक समाजाचा उपमुख्यमंत्री असणार याची घोषणा केली

आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा भंडारी समाजाचा असेल असं सांगून मोठी घोषणा केली लवकरच त्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं जाईल आणि उप मुख्यमंत्री पदी ख्रिस्ती समाजाचा ला प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली या साठी मिशन युनायटेड गोवा च्या खाली काम होणार आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा गोव्याला भेट दिली. त्यांच्या दौऱ्यांमधून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या 60 वर्षात 13 मुख्यमंत्री झाले.त्यामध्ये ब्राह्मण समाज, गोमंतक मराठा समाज, मराठा समाज, कॅथॉलिक समाजाचा समावेश होता.गोव्याच्या लोकसंख्येच्या 30% भंडारी समाजाचा आहे.असे असूनही गोव्यात भंडारींचा एकच मुख्यमंत्री होता. रवी नाईक मुख्यमंत्री झाले मात्र ते सुद्धा फक्त अडीच वर्षांसाठी. म्हणजे 60 वर्षात भंडारी पूर्ण 5 वर्षांच्या कार्यकाळात एकदाही समाजाचे मुख्यमंत्री झाले नाहीत.”अस माध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले.“हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही भंडारी समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री बनवू. याशिवाय प्रत्येक समाजातील लोकांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. ज्या समाजावर अन्याय झाला आहे, त्या समाजाला जोडले जाईल”, असेही ते म्हणाले.“आम्ही जातीचे राजकारण करत नाही. पण समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होत असेल, अशी भावना असेल तर ती दूर व्हायला हवी. भंडारी समाजातील अशा व्यक्तीला आम्ही मुख्यमंत्री चेहरा बनवू. सर्व गोव्यातील जनतेला अभिमान वाटेल अशी ती व्यक्त असेल .ती व्यक्ती सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करेल.आम्ही संपूर्ण गोव्याच्या विकासासाठी काम करू. आम्ही लवकरच आमच्या मुख्यमंत्री चेहऱ्याचे नाव जाहीर करू. यामुळे संपूर्ण ओबीसी समाजही खूश होईल याची आम्हाला खात्री आहे,” असे सिसोदिया म्हणाले.“हे मिशन यशस्वी करण्यासाठी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणावे लागेल आणि म्हणूनच आम्ही ‘युनायटेड गोवा’ या मिशनची घोषणा करत आहोत. या मिशन अंतर्गत आमचे नेते आणि कार्यकर्ते गोव्यात घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचतील.

“गोव्याच्या विकासात भंडारी समाजाच्या लोकांचे मोठे योगदान आहे. तरीही आजपर्यंत कोणत्याही पक्षाने भंडारी समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलेले नाही. त्यामुळे भंडारी समाजातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे”, असे सिसोदिया म्हणाले.

“भंडारी समाजातील लोक विचारतात की भंडारी समाजात काय उणीव आहे की हे सर्व पक्ष भंडारी समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री चेहरा बनवत नाहीत? त्यांना असे वाटते की आजपर्यंत सर्वच पक्षांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी भंडारी समाजाचा वापर केला आहे अस ते म्हणाले.“भाजप-काँग्रेसने फक्त फूट पाडणारे राजकारण केले आहे, आम आदमी पार्टी आता सर्व समाजातील लोकांना एकत्र जोडण्याचे काम करेल, व्होट बँकेचे राजकारण पूर्णपणे संपवावे लागेल अस ते पुढे म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: