गोवा 

प्रेमानंद बाबू नानोस्कर ‘आप’मध्ये…

पणजी :

दाबोळीमधून मगोचे माजी उमेदवार प्रेमानंद (बाबू) नानोस्कर यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. नानोस्कर यांनी काल मगोचा राजीनामा दिल्या नंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली गोव्यासाठी काम करण्याच जाहीर केल .2017 च्या विधानसभा निवडणुकीत नानोस्कर दुसऱ्या क्रमांकावर होते.

नानोस्कर प्रथम 27 व्या वर्षी २०१० मध्ये मुरगाव पालिकेचे नगरसेवक म्हणून निवडणून आले त्या नंतर त्यांनी पालिकेचे उपनगराध्यक्ष पद भूषवले 2012 आणि 2017 मध्ये मगोच्या तिकिटावरून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. ते आपल्या मतदारसंघात सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात नानोस्कर यांनी रहिवाशांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि मतदारसंघाचा मोठा भाग असलेल्या टॅक्सीकरांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी वीज आणि नोकऱ्यांसंदर्भातील पहिल्या दोन आश्वासनांकडे आकर्षित झाल्याचे नानोस्कर म्हणाले. ते म्हणाले की, आप हे गोवेकरांच्या समस्यांवर प्रामाणिकपणे काम करत आहेत. केजरीवाल सरकारच्या कार्यकाळात आम आदमी पक्षाने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली असताना दाबोळीच्या रहिवाशांना त्यांच्या मुलभूत गरजांसाठी भाजप आणि काँग्रेस दोन्हीकडून त्रास सहन करावा लागला. लॉकडाऊन काळात टेक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या अनेकांनी मोठ्या प्रमाणात आपली उपजीविका गमावली आहे. याशिवाय 24/7 वीज आणि योग्य पाणीपुरवठ्याची कमतरता गोवेकरांच्या राहणीमानाला हानी पोहचवत आहे या समस्या सोडविण्यासाठी आम आदमी गंभीर असल्याच ते म्हणाले.

दाबोळीच्या तरुणांनाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे . सावंत सरकारने लॉकडाऊन दरम्यान सामन्य जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. दाबोळीची तरुण पिढी केजरीवाल यांच्या रोजगार हमीकडे आकर्षित झाले, विशेषत: ज्यांनी गोव्यातील पर्यटनावर अवलंबून असलेल्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांना पाठिंबा केजरीवाल देतील “असे आप नेते प्रेमानंद बाबू नानोस्कर म्हणाले.

“आम्ही प्रेमानंद बाबू नानोस्कर यांचे पक्षात स्वागत करतो. गोवेकर मोठ्या संख्येन आपमध्ये सामील होत आहेत कारण त्यांना माहीत आहे की फक्त आप गोव्याचे राजकारण बदलू शकते आणि तरुणांना न्याय देऊ शकते” असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांब्रे म्हणाले

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: