गोवा 

‘आप’च्या वतीने कोरोना विशेष हेल्पलाईन सेवा

पणजी :

कोविड पॉझिटिव्ह किंवा कोविडची लक्षणं असणाऱ्या लोकांना मोफत  वैद्यकीय सल्ला देण्यासाठी आम आदमी पार्टीने (AAP) गोवा येथे  डॉक्टर हेल्पलाईन सुरू केली आहे. कोविड पॉझिटिव्ह असलेले किंवा कोविडचे लक्षणे असणारे नागरिक गोव्यातील आम आदमी पार्टीच्या डॉक्टर हेल्पलाईनवर 7504 7504 75 वर कॉल करू शकतात. हेल्पलाईन दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान कार्यरत असते.

हेल्पलाईन सुविधेच्या सुरू करण्याच्याप्रसंगी आप गोवाचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, “आम्ही आजपासून ही हेल्पलाईन सुरू करत आहोत. जे कोरोना रुग्ण गृहविलगीकरणात आहेत किंवा ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहे त्यांना वैद्यकीय सल्ल्याच्या मदत मिळावी या हेतूने ही हेल्पलाईन सुरू करत आहोत.”

ते पुढे म्हणाले, “राज्यसरकारच्या आजवरच्या भोंगळ कारभारामुळे आरोग्यसेवा पूर्णतः कोलमडली परिणामतः गोमंतकीयांना प्रचंड हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.  परंतु या कठीण परिस्थितीत आम्ही त्यांच्या मदतीसाठी सदैव आहोत.  ज्याला वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता आहे तो आता या हेल्पलाइनवर कॉल करू शकतो आणि डॉक्टरांच्या भेटीसाठी वाट पाहण्याशिवाय उपचार मिळवू शकतो.  आम्हाला आशा आहे की, ही सुविधा जनतेला मदत करेल  आणि आवश्यक पाठिंबा देखील मिळेल. ”

aapआपच्या नेतृत्वाखालील दिल्ली राज्यसरकारने गेल्या वर्षी होम आयसोलेशन (गृहविलगीकरण) मॉडेलचा पुढाकार घेतला. जो आता संपूर्ण भारतात आणि जगभरात वापरला जात आहे.  आज, हा प्रयोग जगासाठी संशोधनाचा विषय बनलेला आहे. ज्याचा उपयोग सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी केला जातो.  यामुळे, गंभीर रूग्णांसाठी रुग्णालयाचे बेड मोकळे होण्यास मदत होते.  आणि या गृहविलगीकरणाच्या मॉडेल अंतर्गत दिल्ली सरकार दूरसंचार सुविधांच्या माध्यमातून रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीवर लक्ष ठेवते.  घरातच विलगीकरणात असलेल्या रुग्णांना त्यांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आणि आवश्यक ती मदत देण्यासाठी दररोज दिल्ली सरकारच्या वतीने डॉक्टर आणि परिचारिकांकडून कॉल येत असतात व रुग्णाशी थेट संवाद साधला जातो.  यासह, या कठीण परिस्थितीत मानसिक तणाव दूर करण्यासाठी देखील डॉक्टरांकडून समुपदेशन केले जाते.  म्हांबरे म्हणाले, “रुग्णांना दररोज मनोबल वाढविणारे कॉल येतात आणि परिणामी त्यांचा चांगला परिणाम होतो.”

आपचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, “लोकांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे, आणि आम आदमी पार्टी ही जबाबदारी स्वीकारत आहे.  आम्ही ही हेल्पलाइन चालवू आणि आज गोयंकरांना आवश्यक असलेली मदत करू. आम्ही गोयंकरांची काळजी घेत आहोत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व काही प्रयत्न करू.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: