गोवा 

‘​आप’​च्या वतीने ‘प्लाझ्मा डोनेशन ड्राइव्ह​’​

​पणजी :​

आप युवा आघाडीतर्फे यशस्वी रक्तदान मोहिमेनंतर आम आदमी पार्टीने आपल्या #GoansAgainstCorona अभियानाचा भाग म्हणून प्लाझ्मा (Plasma) डोनेशन ड्राइव्ह सुरू केला आहे. जीएमसी येथील प्लाझ्मा बँकेत प्लाझ्माच्या कमतरतेमुळे अनेक नागरिकांच्या विनंतीला मान देत​ ​प्लाझ्मा डोनेशन ड्राइव्ह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले.
युवा आघाडीचे समन्वयक श्रीपाद पेडणेकर यांनी सांगितले की, “कमीतकमी 50 देणगीदारांचा डेटाबेस तयार करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवलेले असून 20 देणगीदारांनी यापूर्वीच होकार दिला आहे.”​ ​ “आमच्या काही देणगीदारांनी आजच प्लाझ्मा दान केले आहे.  जीएमसी येथील प्लाझ्मा बँक आवश्यकतेनुसार उर्वरित देणगीदारांचे वेळापत्रक तयार करीत आहे. ”, असे पेडणेकर म्हणाले.पेडणेकर पुढे म्हणाले की,”नेहमीच्या रक्तदान देण्याच्या पद्धतीऐवजी अफेरेसिस पद्धतीने रक्तदान केले गेले तर केवळ त्यातून प्लाझ्मा काढला जातो आणि उरलेले घटक दात्यांच्या शरीरात परत केले जातात.”
पेडणेकर पुढे म्हणाले, “अशा दात्याला दर 15 दिवसांनी प्लाझ्मा दान करण्यास अनुमती मिळते,’ तर नेहमीच्या पद्धतीने रक्तदान करणाऱ्याला तीन महिन्यांतून एकदाच रक्तदान करता येते, असे पेडणेकर म्हणाले.
​​म्हांबरे यांनी माहिती दिली की, “आपच्या कार्यकर्त्यांद्वारे अनेक दाते मिळाले, आणि त्यांनाही या कोविड विरुद्धच्या लढ्यात योगदान देताना सकारात्मक वाटले”​ ​“आम्ही आमच्या ऑक्सिमीटर सेवेच्या लाभार्थींशी संपर्क साधला आहे ज्यांना गृहविलगीकरणादरम्यान विनामूल्य ऑक्सीमीटर देण्यात आले होते. त्यापैकी बरे झाल्यानंतर अनेकांनी प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविली आहे” अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: