गोवा 

गोंयकारांना देणार ३०० युनिट वीज मोफत

​पणजी :
आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या घोषणा केल्यात. यावेळी गोव्याच्या राजकारणावर त्यांनी टीका केली. गोव्याचं राजकारण भ्रष्ट झालं असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केली असून आमदारांच्या घोडेबाजारावरही त्यांनी या पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला.

गोव्यात आपचं सरकार आल्यास विजेचा प्रश्न कायमचा सोडवू, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. पक्ष सोडून भाजपला साथ दिलेल्या आमदारांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. भाजपला जावून मिळालेल्या आमदारांनी चिटिंग केल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. दिल्लीत जर वीज मोफत मिळू शकते, तर गोव्यात का मिळू शकत नाही, असा सवाल त्यांनी भाजपला विचारलाय. गोव्यात चांगल्या शाळा, चांगल्या आरोग्य सुविधा लोकांना का मिळू शकल्या नाही, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

घाणेरडं राजकारण साफ करणारगोव्याचं घाणेरडं राजकारण आम आदमी पक्षाला साफ करायचंय आणि आम्ही जुन्या पक्षांची सफाई करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. आप पक्ष गोव्यात वेगानं वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. गोव्यात जर आपचं सरकार बनलं तर कोणकोणत्या गोष्टी केल्या जातील, यावर महत्त्वाची विधानं अरविंद केजरीवाल यांनी केलंय.गोंयकारांना विजेचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर कायमचा तोडगा आप सरकार काढेल. दिल्लीप्रमाणेत गोव्यातील लोकांना विजेत सूट दिली जाईल. प्रत्येक कुटूंबाला दर महिना ३०० यूनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिलंय. त्याचप्रमाणे विजेची जुनी बिलं पूर्णपणे माफ करणार असल्याचंही आश्वासन दिलं जाणार आहे. दरम्यान, गोवेकरांना २४ तास वीज देण्याचं आश्वासनही दिलाय. तसंच शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्यात येणार असल्याचीही घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 87% गोव्याचा वीजबिलाचा प्रश्न कायमचा मिटेल असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाची आश्वासनं कोणती?

१. प्रत्येक कुटूंबाला दर महिना ३०० यूनिट वीज मोफत
२. विजेची जुनी बिलं पूर्ण माफ करणार
३. गोंयकरांना २४ तास वीज देणार
४. शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: