Home

‘आप’चे गोव्यामध्ये ‘ऑक्सिमित्र अभियान’

पणजीः
आम आदमी पार्टीने (AAP)  #GoansAgainstCorona या मोहिमेला बळकट करण्यासाठी ऑक्सिमीटर यंत्र नसलेल्या गृहविलगीकरणातील कोरोना रूग्णांना ऑक्सिमीटर प्रदान करून ऑक्सिमित्र या अभियानाद्वारे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहे. राज्याचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी आवश्यक असलेले ऑक्सिमीटर सारखी साधने त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याकारणाने त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं. यासंदर्भात राज्यांतील जनतेने आपशी संपर्क साधला. व ही भीती  दूर करण्यासाठी आम आदमी पार्टीने (AAP)ऑक्सिमित्र अभियानाद्वारे त्यांना थेट घरपोच ऑक्सिमीटर प्रदान करण्याचं ठरवलं.
आपच्या डॉ. विभास प्रभुदेसाई यांनी लक्ष वेधलं की, गोव्यातील वाढत्या कोरोना रूग्णांमुळे तसंच वाढत्या गृहविलगीकरणामुळे शासकीय आरोग्य केंद्रांकडे गृहविलगीकरणासाठीचे अत्यंत महत्त्वाचं आरोग्य किट संपत आहे. दररोज हजारो नवीन कोरोना रुग्णांमध्ये भर पडत असताना प्रभुदेसाई यांनी सांगितलं की, फार्मसी आणि मेडिकल स्टोअरमध्येही ऑक्सिमीटरचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. गेल्या वर्षी गोव्यातील पहिल्या लाटेच्या वेळी सरकार प्रत्येक कोरोना बाधित व्यक्तीला सरकारी कोविड केंद्रात भरती करीत होती. परिणामी, अपुर्‍या क्षमतेमुळे अनागोंदी निर्माण झाली होती, ज्यामुळे कोरोना बाधित रूग्ण घरात किंवा तातडीने ग्रामीण स्तरातील केंद्रामध्ये कोणत्याही देखरेखीशिवाय किंवा उपचाराशिवाय अडकले होते. या गंभीर वेळी ‘आप’ने गोव्यात गृहविलगीकरण अंमलात आणण्यासाठी सरकारला यशस्वीरित्या विश्वास दिला व गृहविलगीकरणाची मागणी मान्य करवून घेतली. तर शेकडो अशा रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सीमीटर उपकरण देऊन सहकार्य केलं.
AAPगेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या #GoansAgainstCorona मोहिमेला केवळ गोंयकार नव्हे, तर डॉक्टर्स, आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं व ‘आप’ने केलेल्या कार्याचं कौतुक केलं. डॉ. प्रभुदेसाई यांनी आठवण करून दिली की, इंडियन मेडिकल असोसिएशनने (गोवा चॅप्टर) सार्वजनिकरित्या आपल्या पत्रकार परिषदेत ‘आप’च्या या कार्याची प्रशंसा केली असल्याचं डॉ. प्रभुदेसाई म्हणाले
कोविड बाधित रुग्णांना ऑक्सिमीटर मिळत नसल्यास त्यांनी घाबरून जाऊ नये. आपल्याला ऑक्सिमीटर उपलब्ध होण्याच्या विनंतीसाठी https://forms.gle/G7rTkjUKEFSm498W7 या लिंकवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी. लवकरच ‘आप’ चे ऑक्सिमित्र रूग्णांपर्यंत पोहोचतील असं आश्वासन म्हांबरे यांनी दिलं.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: