गोवा 

‘आप’च्यावतीने राज्यात ऑक्सिजन तपासणी केंद्रे

पणजी :

आम आदमी पक्षाने संपूर्ण गोव्यात ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, जिथे लोक सहजरित्या जाऊन ऑक्सिजन संपृक्तता पातळी तपासू शकतात आणि त्यानुसार कोरोना प्रसाराला अटकाव करता येऊ शकेल. सध्या २४० ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू केली असून लवकरच ती ३०० पर्यंत वाढविली जातील, असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले.

आप कार्यकर्त्यांनी ठीकठिकाणी ही केंद्रे उभारली गेली आहेत आणि केंद्राची ओळख पटवण्यासाठी बॅनर लावले आहेत. जर ऑक्सिजन संपृक्तता पातळी ९५ च्या खाली असेल तर संबंधित व्यक्तीस सल्ला घेण्यासाठी वैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा लागेल.

“आता ही सेवाही विनामूल्य आहे आणि ज्यांना थोडीशी अस्वस्थता जाणवत असेल त्यांना येऊन ऑक्सिजन पातळीची तपासणी घेता येईल,” असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी  या केंद्रांचा वापर करण्याचे आवाहन करतना सांगितले.

कर्फ्यूच्या पहिल्या दिवसापासून गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांना ऑक्सिमीटरचे वितरण,शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना जेवण पुरवल्यानंतर, गोव्यातील लोकांसह कोरोनाशी लढण्याचा हा आणखी एक उपक्रम सांगण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: