गोवा 

‘आप’ने दिला राज्य सरकारला पाठिंबा 

पणजी :
31 मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमती दर्शवत आम आदमी पक्षाने आज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पुन्हा एकदा गोयंकरांना दिलासा देण्याचे आवाहन केले. अखेर लॉकडाऊनची मुदतवाढ करण्याची मागणी मान्य केल्याचे पक्षाने निदर्शनास आणून दिले.

आपच्या गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी लॉकडाऊन वाढीच्या निर्णयाशी सहमती दर्शवताना मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली की त्यांनी या विषाणूमुळे पीडित लोकांना मदत करण्याच्या केजरीवाल मॉडेलचे अनुसरण करावे आणि दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी याआधी पुरविल्या गेलेल्या सुविधा गोयंकरांना देखील द्याव्यात​ अशी मागणी केली​.

​त्याचप्रमाणे राज्यातील मोटारसायकल चालक, लहान व्यवसायिक आणि विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करून त्यांनाही सरकारने दिलासा देण्याचे आवाहन म्हांबरे यांनी यावेळी केले.

“शिवाय गृहाधार देयके देखील  रखडली आहेत, हे ही लक्षात घेतले पाहिजे.  पेट्रोलच्या वाढत्या 91 रुपयांच्या किंमतीमुळे गोयंकरांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गृहाधारांच्या देयकाकडे दुर्लक्ष करणे आणि आणखी त्यात पेट्रोलच्या किंमतीत वाढ करून ​नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणे, हे मुख्यमंत्र्यांच्या असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे.” असे आप गोव्याच्या उपाध्यक्षा अ‍ॅड प्रतिमा  ​कुतिन्हो म्हणाल्या.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: