google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे आज १५ मार्च रोजी निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. समीर खक्कर तब्बल ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत होते.

टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, समीर यांच्या पार्थिवावर आज बोरिवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

समीर यांनी दूरदर्शनवर काही लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केलं होतं. ‘नुक्कड’, ‘मनोरंजन’, ‘सर्कस’, ‘नया नुक्कड’, ‘श्रीमान श्रीमती’ आणि ‘अदालत’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. सुरभी चंदना आणि नमित खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘संजीवनी’मध्ये ते अखेरचे दिसले होते.

मधल्या काळात समीर यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. नंतर, ते परत आले आणि त्यांनी काम सुरू केलं. समीर यांनी सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय त्यांनी गुजराती नाटकांमध्येही भूमिका केल्या होत्या.

दरम्यान, अमेरिकेतून परतल्यानंतर आपण चांगल्या भूमिकांच्या शोधात असल्याचं त्यांनी एकदा म्हटलं होतं. “प्रत्येकजण कामाच्या शोधात असतो आणि मीही. आणि काम शोधणे म्हणजे कामासाठी विचारणे आणि नोकरीसाठी अर्ज करणे. अभिनेत्यांच्या बाबतीत, प्रत्येक चित्रपट किंवा शो हा रोजचा व्यायाम आहे. पण मी एक वाईट सेल्समन आहे. मला आशा आहे की जे लोक मला ओळखतात ते मला कामाची ऑफर देतील. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मला आयुष्यभर लोकांचे मनोरंजन करायचे आहे, मी अजून थकलेलो नाही,” असं समीर खक्कर म्हणाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!