गोवा 

१०० तास झाले विजेसोबत स्थानिक आमदारही गायब : आप

​पणजी:

आम आदमी पक्षाच्या म्हापसा युनिटने 4 दिवसांपासून शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याबद्दल भाजपा सरकार आणि खासकरुन त्यांच्या म्हापसाच्या आमदाराचा निषेध केला आहे. म्हापसा येथील रहिवासी आणि राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, भाजपने म्हापसाकरांची मते मिळविण्यासाठी त्यांना मोठी आश्वासने दिली होती. परंतु त्यांनी लोकांना मूर्खात काढत केवळ त्यांना परिवारराज देण्यात आला, आमदार म्हणून घराणेशाहीतील हा लोकप्रतिनिधी पूर्णतः अपयशी ठरला. “100 तासांपेक्षा जास्त वेळ आम्ही म्हापसाकर अंधारात आहोत. निवडणुकीच्या वेळी भाजपाने आश्वासित केलेला विकास हाच आहे का?  असे वाटते की म्हापसाला भाजपने अश्मयुगात परत नेले आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया राहुल म्हांबरे यांनी दिली.

म्हांबरे यांनी माजी आमदार दिवंगत फ्रान्सिस डिसूझा यांचा मुलगा जोशुआ डिसूझा पुन्हा एकदा  या संकटकाळी पूर्णपणे अनुपस्थित व गायब असल्याच्या औदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त केली. आणि ते म्हणाले की, “स्वत: च्या बंगल्यात वीज जनरेटर चालविला जात असल्याने जोशुआ यांना सर्वसामान्यांच्या दु:खाची काळजी नाही.”

“स्थानिक व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  लोक पाण्याच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत, त्यांना त्यांच्या सदनिकेत बादलीने पाणी आणावे लागत आहे.  मुले आणि ज्येष्ठ नागरिक यामुळे विशेषत: प्रभावित झाले आहेत.  म्हापसात संपूर्ण गदारोळ माजला आहे. परंतु वडिलांच्या वारशाने आमदारकी मिळविलेले ‘राजकुमार’ जोशुआ मात्र डोंगराच्या माथ्यावर असलेल्या आपल्या किल्ल्यात आनंदाने राहात आहे. त्यांना जनतेची कवडीची किंमत नाही ”, अशी खणखणीत टीका म्हांबरे यांनी केली.

म्हांबरे यांनी जून 2019 च्या डीसूझा यांना त्यांच्या स्वतःच्याच आश्वासनाची आठवण करून दिली की “म्हापसातील ऊर्जा संकट लवकरच भूतकाळातील जमा होईल” असे आश्वासन दिले होते. डिसूझा यांनी दोन वर्षांपूर्वी म्हापसामध्ये वीजवाहिन्यांच्या भूमिगत केबलिंगसाठी जाहीर केलेली 131 कोटी रुपयांचे नक्की काय झाले? हे म्हांबरे यांनी जाणून घेण्याची मागणी केली.

goa aap
राहुल म्हांबरे

म्हांबरे म्हणाले की, उपलब्ध साधनांसह वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न करत असलेल्या संपूर्ण गोव्यातील विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आम आदमी पार्टीच्या वतीने कौतुक आहे.  कर्मचार्‍यांना आवश्यक असणारी सामान्य व अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी ऊर्जा मंत्रालय व राज्य सरकारला जबाबदार धरले.  आप’च्या म्हापसा युनिटने काल लाइनमनला (वीजविभागाच्या कर्मचाऱ्यांना) फूड पाकिटे उपलब्ध करुन दिली. कारण ते सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय, विना विश्रांतीने बरेच तास सलग काम करत होते, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.

अनेक वर्षांपासून भाजपच्या चुकीच्या कारभारामुळे म्हापसा येथील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याची टीका म्हांबरे यांनी केली. “एरवी म्हपसाचे भाजपा मंडल प्रत्येक विषयावर आपल्या सरकारचा बचाव करण्यास सदैव तत्पर असते मात्र आता ते मूग गिळून गप्प आहेत कारण त्यांना माहीत आहे की, लोकांचा विश्वास त्यांनी पूर्णपणे गमावलेला आहेत.”असे ते म्हणाले. म्हांबरे म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्तांनी आता हे जाणले पाहिजे की त्यांची राजकीय निष्ठा ही कोरोनाकाळात किंवा चक्रीवादळाच्या वेळी त्यांच्या स्वतःच्या कुटूंबालादेखील वाचवू शकले नाही किंवा त्यांना दिलासा देऊ शकले नाहीत. मात्र प्रश्न आपल्या  जगण्या-मारण्याचा असल्याने त्यांनी आता म्हापसेकरांच्या समर्थनार्थ बाहेर यावे, आवाज उठवावा, असे आवाहन म्हांबरे यांनी केले.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: