Home

‘आग्वाद जेल परिसर सुशोभीकरण देशातील अग्रगण्य प्रकल्प’

पेडणे ​(प्रतिनिधी) :​
गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यभर चालू असलेल्या  विविध विकास आणि सुशोभीकरण प्रकल्पाची मुख्यमंत्री ​डॉ. प्रमोद सावंत हे मनमोकळेपणाने प्रशंसा करत आहेत​.  त्यातील काही प्रकल्प देशातील प्रकल्पात समाविष्ठ करणारा म्हणजे आग्वाद येथील जेल परिसराचे सुशोभीकरण हे उदाहरण असल्याचे गोवा पर्यटन विकास महामंडळ ​चेअरमन तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी यांनी उद्गार मांद्रे दांडोसवाडा येथील ​राष्ट्रोळी देवस्थान परिसराचे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते .

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत , माजी सरपंच दिलीप वस्त , मिलिंद तळकर , मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब ,दाजी आसगावकर , देवस्थान अध्यक्ष सुनील आसोलकर , मांद्रे माजी सरपंच संजय बर्डे , आबा सावंत आदी उपस्थित होते .

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना २६ कोटी रुपये खर्च करून आग्वाद जेल सुशोभीकरण केले , हा प्रकल्प देशातील  अग्रगण्य समजला जातो .त्याची मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून वारंवार प्रशंसा केली जात आहे , त्यावरूनच या मंडळाकडून जी विकासकामे चालू आहेत त्याचा प्रत्यय येतो .असे सांगून मांद्रे मतदार संघातही अशी कामे केली जात आहे असे त्यांनी सांगितले .


मुख्यमंत्री नसले तरीही कामे ; सुनील आसोलकर
देवस्थान अध्यक्ष सुनील आसोलकर यांनी बोलताना , आमदार दयानंद सोपटे हे मंत्री मुख्य्यमंत्री नसले तरीही ते मुख्यमंत्र्याच्या लेवलवर विकास कामे करत आहेत , शिर्डी माझे पंढरपूर यांचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर पार्से येथील श्री भगवती मंदिरात भेट दिल्यावर प्रत्यय येतो असे त्यांनी सांगितले , विकास करण्याची नजर हवी ती नजर आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे असल्याचे आसोलकर म्हणाले .​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: