google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबद्ध’

सातारा :

ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्‍या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे. नेहमीप्रमाणे उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवत अजिंक्यतारा कारखाना होवू घातलेल्या हंगामात गाळपास येणार्‍या ऊसाला किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द आहे, असे आश्‍वासक प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२०२३ च्या गळीत हंगामाकरिता यंत्रसामुग्री देखभाल, दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील पहिल्या रोलर पूजनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कामगार-कर्मचारी उपस्थित होते.



मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे ऊसाचे क्षेत्रामध्ये वाढ झाली असल्याने या हंगामाकरिता एकूण ९९७१.१६ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. त्यामधून सुमारे ९ लक्ष मे.टन ऊस गाळपास उपलब्ध होईल. या हंगामात उच्चतम साखर उतारा व कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त साखरेचे उत्पादन घेणे तसेच उपपदार्थांच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक गाळप हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न करून १००% एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना वेळेत आदा केली जात आहे. गाळपास आलेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट वेळेत आदा केले असल्यामुळे ऊस उत्पादक, सभासद, बिगर सभासदांमध्ये अजिंक्यतारा कारखान्याबाबत समाधान असून अजिंक्यतारा परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.



यावेळी जेष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, लालासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती वनिता गोरे, सतीश चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत, पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, सूर्यकांत धनवडे, गणपत शिंदे, दिलीप फडतरे, सुनील काटे, धनाजी शेडगे, बाळकृष्ण फडतरे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष जालिंदर महाडिक, संचालक अजित साळुंखे, पंडितराव सावंत, शिवाजी सावंत, गणपत मोहिते, दादा शेळके यांच्यासह सातारा आणि जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!