सिनेनामा 

जीवन आणि राजकारणाची स्पंदने दाखवणारा ‘माय फादर्स शॅडो’

आज इफ्फी मध्ये दोन वेगळे पण भावनिकरीत्या परस्परांशी प्रतिध्वनीत होणारे चित्रपट आणि चित्रपटकर्मी एकत्र आले. ‘मदर्स बेबी’ आणि ‘माय फादर्स शॅडो’ च्या टीमने कला, स्मृती आणि जिवंत वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या जिव्हाळ्याच्या मार्गांवर मनस्वी संवाद साधला. या सत्रात ‘मदर्स बेबी’ चे सिनेमॅटोग्राफर रॉबर्ट ओबेरेनर आणि प्रोडक्शन डिझायनर जोहान्स सॅलट यांच्यासोबत ‘माय फादर्स शॅडो’ चे दिग्दर्शक अकिनोला ओगुनमेड डेव्हिस एकत्र आले होते. हे चित्रपट यूकेच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशामुळे आणि कानमध्ये  प्रदर्शित होणारा पहिला नायजेरियन चित्रपट म्हणून जगभरात नावलौकिक मिळवत आहेत.

लागोसचा एक  दिवस जो आयुष्यभर लक्षात राहतो : अकिनोलाचा अंतर्ज्ञानी चित्रपट निर्मिती प्रवास

संवाद  सुरु करताना, अकिनोलाने ‘माय फादर्स शॅडो’ची सुरुवात त्याच्या भावाने लिहिलेल्या एका लघुकथेपासून केली. 1993 च्या नायजेरियन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हा चित्रपट राजकीय तणावाच्या त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो.

अकिनोलाने स्पष्ट केले की त्याच्या सर्जनशील प्रक्रियेचा बहुतांश  भाग अंतःप्रेरणेने निर्देशित आहे. “ही सूक्ष्म कथा वडील आणि त्यांच्या मुलांची आहे तर त्यातील बृहत कथा निवडणुकीची आहे आणि त्यात सर्वकाही त्यात एकजीव होते,” असे त्यांनी सांगितले. चित्रपट एकाच दिवसात पुढे जातो, ज्याचे वर्णन अकिनोला मुक्तिदायक विकल्प असे करतात. “त्यातून  आम्हाला नैसर्गिकरित्या तणाव निर्माण करता आला. आणि सर्व काही एकाच दिवसात घडत असल्याने, आम्ही एकसंधतेने बांधलेले नव्हतो. आम्ही भावनांवर लक्ष केंद्रित करू शकलो.”

चित्रपट निर्मात्याने चित्रीकरणातील भावनिक आणि तांत्रिक अडचणींबद्दल, विशेषतः समुद्रकिनाऱ्यावरील दृश्यांबद्दल मोकळेपणाने संवाद साधला. तिथे 16 एमएमचा चित्रपट उष्णता आणि आवाजाशी झुंजत होता. एका अंत्यसंस्काराच्या दृश्याने त्याला भावनिकदृष्ट्या थकवले: “मी दोन दिवस अंथरुणावर पडलो आणि रडलो,” अशी कबुली देत त्यांनी अशा क्षणांना “शक्तिशाली चित्रपट निर्मितीचा दाखला ” असे संबोधले.

बोलताना अकिनोलांनी प्रेक्षकांना नायजेरियाची एक सुंदर झलक दाखवली.  त्याने नायजेरियाचे राजकीय परिदृश्य, भाषिक विविधता आणि  शिक्षणातील तफावत आदी मुद्द्यांवर देखील भाष्य केले. इंग्रजी, क्रिओल आणि रस्त्यावरील स्थानिक भाषांना त्याच्या चित्रपटात स्थान मिळाले आहे  आणि अकिनोलांसाठी ही भाषिक तरलता नायजेरिया परिभाषित करणारे  सामाजिक आणि सांस्कृतिक मिश्रण दर्शवते. त्यांच्या विचारांनी समकालीन चित्रपट इतिहासात कमी प्रतिनिधित्व असलेल्या देशाचे एक जिवंत चित्र रंगवले.

‘मदर्स बेबी’ मधील मातृत्वाचे अव्यक्त, अस्वस्थ करणारे चित्रण 

‘मदर्स बेबी’ बनवणाऱ्या  टीमसाठी, चित्रपटाचे भावनिक इंजिन बाळंतपणानंतरच्या भयावह स्थितीतून  मार्ग काढणाऱ्या एका महिलेचा प्रवास होता. सिनेमॅटोग्राफर रॉबर्ट ओबेरेनर यांनी सांगितले की त्यांचा मुख्य हेतू “प्रसूतीदरम्यान महिलांमध्ये होणारे वास्तविक बदल” चित्रित करणे हा होता.

हा चित्रपट जुलिया या प्रसिद्ध वाद्यवृंद चालिकेच्या आयुष्यावर आहे. ती एका प्रयोगशील कृत्रिम प्रजनन प्रक्रियेद्वारे गर्भावती राहते, मात्र ही पद्धत तिला अपरिचित अर्थात ज्ञात पद्धतींपैकी असल्याचे वाटत नाही. आपल्याला या चित्रपटाला असा दृश्यात्मक अनुभव द्यायचा होता, की प्रेक्षकांना आपण प्रत्यक्ष ज्युलिया सोबतच वावरतो आहोत असे वाटेल आणि त्यांना त्यांना अस्वस्थ करणाऱ्या मानसिक स्थितीचा अनुभव घेतो आहोत असे वाटले पाहीजे, आणि तसेच चित्रण आपण केले आहे, असे  रॉबर्ट यांनी सांगितले.

या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सांभाळणारे जोहान्स सालात यांनी कथानाकतली संकल्पना किती महत्वाची आहे हे अधोरेखीत केले. या चित्रपटात मांडलेला  विषय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच हा चित्रपट म्हणजे प्रत्येक्षात कधीही, कुठेही घडू शकणारी सार्वत्रिक कथा असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचे भावविश्व  निर्माण करणे खूपच आव्हानात्मक आणि तितकेच उस्फूर्त होते, चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अखेरीस जे ठिकाण निवडले गेले, ते जणू या कथेसाठीच बनलेले होते, असा अनुभव त्यांनी सामायिक केला.

या चित्रपटात दाखवलेला तणाव हळूवारपणे वाढत जातो, बाळ आणि आई या दोघांबाबतीत इतरांच्या प्रतिक्रिया आणि आईच्या आपल्या बाळाप्रती असलेल्या प्रतिक्रिया यात असलेली अत्यंत सूक्ष्म विसंगती या चित्रपटात दाखवली आहे. तिथूनच या चित्रपटातल्या उत्कंठेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते, असे रॉबर्ट यांनी अधोरेखित केले. त्यांनी या चित्रपटाच्या अनुत्तरीत शेवटाबद्दलही चर्चा केली. हा शेवट म्हणजे एक कोडे आहे, ते प्रेक्षकांनी सोडवायला हवे असे ते म्हणाले.

मार्ग बदलण्याची कला : पुनर्कल्पना म्हणून निर्मिती

दोन्ही चित्रपटांच्या चमूंनी चित्रपट निर्मिती ही सातत्याने बदलत जाणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. ‘मदर्स बेबी’ मध्ये, चित्रपटाच्या उत्तरार्धात वापरण्यासाठी चित्रित केलेली दृश्ये अनेक ठिकाणी सुरुवातीच्या भागात वापरली आहेत, अशी माहिती रॉबर्ट यांनी दिली. छायाचित्रकार म्हणून सुरुवातीला आपला या निर्णयांना विरोध होता, पण दिग्दर्शकाने कथानकातल्या सातत्याआधी भावना येत असते याची जाणिव करून दिल्याचा अनुभवही त्यांनी सामायिक केला.

जोहान्स यांनी देखील रॉबर्ट यांच्या मतांशी सहमती व्यक्त केली. चित्रपट निर्मिती प्रक्रियेत अनेकदा अनपेक्षित वळणे येतात, असे त्यांनी नमूद केले: कधीकधी तुमच्या हाती अशा काही गोष्टी लागतात की तुम्ही त्याची कल्पनाच केलेली नसते, पण प्रत्यक्षात त्या गोष्टी फारच परिणामकारक ठरतात असे त्यांनी सांगितले. अकिनोला यांनीही या भावनांना दुजोरा दिला,  आपण लिहिताना, चित्रीकरण करताना आणि नंतर संपादन करताना अशा तीन वेळा चित्रपट बनवत असतो, असे त्यांनी सांगितले, दिशा बदलणे म्हणजे भरकटणे होत नाही, तर त्याचा अर्थ शोध घेणे असा असतो असे त्यांनी अधोरेखित केले.

या सत्राच्या समारोपाने उपस्थितांसाठी अनुभवांचा एक चैतन्यपूर्ण प्रवाह लाभला होता. दोन परस्परविरोधी भूभागात साकारले गेलेले हे दोन चित्रपट तरी देखील नैसर्गिक भावना, कलात्मक सत्य, कथात्मक मांडणीतील विश्वास, आणि अनपेक्षित वळणे या पैलूंनी या चित्रपटांना एकत्र जोडले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!