देश-विदेश

‘सगळे पत्रकार आता करोना योद्धा’

कोलकाता :
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय व तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज एक घोषणा केली. या पुढे आता पश्चिम बंगालमधील सगळे पत्रकार देखील करोना योद्धे (covid warriors) असणार आहेत.
”मी सर्व पत्रकारांना कोविड योद्धा असं घोषित करते.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांसमोर जाहीर केलं आहे. याशिवाय आज मध्य प्रदेश सरकारने देखील सर्व मान्यताप्राप्त पत्रकरांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कालच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील, श्रमिक पत्रकारांना फ्रंटलाईन कोविड वॉरियर्स म्हणून घोषित केलं आहे.
Bangal Election Resultमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या की, मी सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे व कोणत्याही प्रकारच्या हिंसेत सहभागी न होण्याचे आवाहन करते आहे. आपल्याला माहिती आहे की भाजपा व केंद्रीय सुरक्षा दलांनी आपल्याला किती त्रास दिला आहे. सध्या आपण करोनाविरोधात लढत आहोत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: