क्रीडा-अर्थमतगोवा 

‘कॉंग्रेस फक्त खेळाडुनांच सर्व क्रिडा संघटनांवर प्रतिनिधीत्व देणार’

पणजी :

राज्य व देशासाठी योगदान दिलेल्या सर्व क्रिडापटूंचा तसेच क्रिडा संघटनांचा सन्मान करणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य ठरते. २०२२ मध्ये सत्तेत आल्यानंतर कॉंग्रेस पक्ष सर्व क्रिडा संघटनांवर केवळ क्रिडापटूंची नेमणुक करणार असल्याची घोषणा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

आज कॉंग्रेस भवनात आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू आल्विटो डिकून्हा यांच्या कॉंग्रेस प्रवेशावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष ज्यो डायस, कॉंग्रेस सरचिटणीस जनार्दन भांडारी, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नामवंत फुटबॉलपटू आल्विटो यांना कॉंग्रेस पक्षाची ९ नंबरची जर्सी देवुन त्यांचे गिरीश चोडणकर यांनी स्वागत केले.

भाजप सरकारचे भ्रष्ट क्रिडामंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी क्रिडा खाते हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनविला आहे. भाजपच्या भ्रष्ट क्रिडामंत्र्यांनी आपल्या ३० टक्के कमिशनच्या आशेसाठी क्रिडापटू व क्रिडा संघटनांचे हक्काचे अर्थसहाय्य अडवुन ठेवले आहे. सन २०१८ पासुनचे अर्थसहाय्य सरकारने अजुनही दिलेले नाही असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

सरकारने सदर अर्थसहाय्य पुढील पंधरा दिवसांत न दिल्यास कॉंग्रेस पक्ष क्रिडा खात्यातील सर्व थकीत अर्थसहाय्य रकमेची आकडेवारी लोकांसमोर ठेवणार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी यावेळी जाहिर केले.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी बाबू आजगांवकरांचे बंधू डॉ. श्रीकांत आजगावकरांची नेमणुक गोवा फुटबॉल विकास परिषद व गोवा क्रिडा प्राधिकरणावर करुन “घराणेशाही” ला चालना दिली. आल्विटो डिकून्हा सारखे अनेक क्रिडापटूना डावलुन फुटबॉल मध्ये हवा सुद्धा न भरलेल्या डॉ. श्रीकांत आजगावकरांची नेमणुक करुन भाजप सरकारने गोव्यातील नामवंत खेळाडुंचा अपमानच केला असे गिरीश चोडणकर म्हणाले.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांचा खासगी ठराव विधानसभेत मंजुर झाल्यानंतर ही भाजप सरकार फातोर्ड्याच्या पं. जवाहरलाल स्टेडियमच्या स्टॅंडला मोंत क्रुझ यांचे नाव देण्यास टाळाटाळ करीत आहे असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, बाळकृष्ण होडारकर, व्हिक्टर गोंसाल्वीस यांची यावेळी आल्विटो डिकून्हा यांचे कॉंग्रेस पक्षात स्वागत करणारी भाषणे झाली. एल्विस गोम्स यांनी सुत्रसंचालन केले.

कॉंग्रेस पक्षात प्रवेश करताना मला आनंद होत आहे. गोव्यात खेळाडुना मान सन्मान तसेच सर्व प्रकारचे सहाय्य देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर प्रयत्न करावेत व योग्य योजना आखाव्यात असे आल्विटो डिकून्हा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कॉंग्रेसचे समाजमाध्यम प्रमुख हिमांशू तिवरेकर, अर्चित नाईक, अमित पाटकर, शेख अली व इतर कॉंग्रेसजन यावेळी हजर होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: