गोवा 

अंबादास जोशी राज्याचे नवे लोकायुक्त

पणजी:
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांची गोवा लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी लोकायुक्तपदाची शपथ घेतली.
गोव्याचे नवनिर्वाचित लोकायुक्त अंबादास जोशींनी शुक्रवारी लोकायुक्त कार्यालयाचा ताबा घेण्यापूर्वी सकाळी 11 वा. राज्यपालांकडून त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत त्यांना शपथ दिली. हा कार्यक्रम दोनापावला येथील राजभवनात संपन्न झाला.
राज्याचे माजी लोकायुक्त एम. के. मिश्रा हे 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यात निवृत्त झाले होते. गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्याच्या लोकायुक्त पदी अंबादास जोशी यांच्या नावाला 5 एप्रिलला मंजुरी दिली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: