देश-विदेश

‘या संकट काळात आम्ही भारतासोबत आहोत’

वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असलेल्या भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या महामारीच्या सुरुवातीलाच आम्ही भारताला मदत केली होती. पण, सध्या भारतातील स्थिती बिकट असून आता आणखीन मदत करण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत, असंही कमला हॅरिस म्हणाल्या.
कोरोना संक्रमणामुळे भारतात दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या धक्कादायक आणि मनाला वेदनादायी आहे. अनेक भारतीयांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं आहे, त्या सर्वांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, त्यांच्या वेदना मी समजू शकते. या बिकट परिस्थितीत आम्ही आमच्याकडून शक्य तेवढी मदत करू, असे त्या म्हणाल्या.
आम्ही यापूर्वीच भारताला रिफिलेबल ऑक्सिजन सिलेंडर दिले आहेत. आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरदेखील पाठवले आहेत. यासोबतच अमेरिकेने भारताला एन 95 मास्क तसंच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रेमेडिसवीरचे डोसही दिले आहेत. सध्याचं संकट पाहता आम्ही आणखी मदत करण्यासही तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: