सातारा 

मांडवेतील वृद्धेचा ओढ्यात बुडून मृत्यू

सातारा (महेश पवार):
शहरासह जिल्ह्याच्या काही भागाला आज दुपारपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सातारा तालुक्यातील मांडवे गावामध्ये ओढ्याला आलेल्या महापुरात  वाहून गेल्याने एका वृध्देचा मृत्यू झाला.

पुतळाबाई सुधाकर माने (वय ७१, रा. मांडवे) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. गावाजवळच्या ओढ्यात घटनास्थळापासून सुमारे १०० मिटर अंतरावर झाडात अडकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळाला.

गेल्या ४ दिवसांपासून सायंकाळच्या वेळेला सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील मांडवे गावाजवळ ओढ्याला आलेल्या महापुरात ७१ वर्षांची वृद्धा वाहून जाऊन बेपत्ता झाली. ही महिला गुरे चारण्यासाठी शेतात गेली होती. पावसाची चिन्हे दिसू लागल्यामुळे तेथून परत येत असताना वाटेतच पावसानं गाठलं आणि ओढ्यात वाहून जाऊन ती बेपत्ता झाली.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: