सिनेनामादेश-विदेश

कोविड व्यवस्थापनावरून अनुपम खेर यांचा मोदींवर निशाणा

मुंबई :
देशात कोरोना कहर वाढलेला असून, केंद्राच्या एकूण व्यवस्थापनाचा फटका संपूर्ण देशाला झाला आहे. अशावेळी सामान्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू लावून धरणारेही आता मोदींविरोधात खुलेआम बोलू लागले आहेत. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वास्तविक अनुमप खेर (anupam kher) हे मोदींचे प्रशंसक मानले जातात. मात्र देशातील सध्य परिस्थिती पाहून अनुमप खेर यांनी मोदी सरकारवर पहिल्यांदाच खुलेआम टीका केली आहे.

नुकत्याच एनडीटीव्ही वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर (anupam kher) यांनी सरकारला दोष दिले आहे. ते म्हणाले, “कोव्हिडमुळे देशात सध्या जी स्थिती निर्माण झालीय त्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीत प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेच आहे हे सरकारला लक्षात घ्यायला हवं.सरकारच्या आरोग्य सेवा व्यवस्थापनात चूक झाली आहे. मात्र इतर राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी या चुकांचा फायदा घेऊ नये.” असं म्हणत अनुपन खेर (anupam kher) यांनी सरकारला दोष दाखवून दिले आहेत.

या मुलाखतीत पुढे ते म्हणाले, “सरकारने आता या आव्हानाचा सामना करणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्यासाठी काही करण्याची आता वेळ आलीय.” असं ते म्हणाले.सध्या देशभरातून मोदी सरकारवर टीका होतेय यावर ते म्हणाले, ” काही प्रमाणात टीका करणं वैध आहे. एखाद्या निर्दयी व्यक्तीलाच गंगा नदीतील मृतदेह पाहून फरक पडणार नाही. ” गंगा नदीत आढळून आलेल्या मृतदेहांच्या बाबतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय.“सध्या खूप समस्या, वेदना, राग,निराशा अशा गोष्टींचा आपण सामना करतोय. ते सहाजिक आहे. अनेक लोक म्हणतात मी खूप आशावादी आहे. पण माझ्याकडे त्याशिवाय पर्याय नाही. सध्या संपूर्ण जग या समस्येचा सामना करतंय.” असं ते म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: