मुंबई 

‘अपोलो’ देणार गरजू मुलांना मोफत डिजिटल सल्ला

नवी मुंबई :
डॉ प्रताप सी रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्थापन केलेले अपोलो हॉस्पिटल्स फाउंडेशन समाजासाठी अतिशय अनोख्या आणि अभूतपूर्व पद्धतीने योगदान देत असते. वंचित वर्गातील मुलांना वैद्यकीय मदत पुरवणे हा या फाउंडेशनचा एक प्रमुख उपक्रम आहे.  अपोलो हॉस्पिटल्सच्या जॉईंट एमडी डॉ संगीता रेड्डी यांनी याच उपक्रमाला अनुसरून “गरजू मुलांना दर्जेदार आरोग्यसेवा निःशुल्क आणि समान पद्धतीने उपलब्ध करवून देण्याचे’ उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून एका उपक्रमाची संकल्पना तयार केली आहे.

अपोलो २४/७ डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत एक वर्षभरासाठी (७ जुलै २०२२ पर्यंत) अपोलो हॉस्पिटल्सच्या बालरोग तज्ञांचा सल्ला निःशुल्क उपलब्ध करवून देऊन उत्तम आरोग्याचा पाया रचला जावा हे ‘सेविंग अ चाईल्डस् हेल्थ इनिशिएटिव्ह’ (साची – SACHi) या लहान मुलांसाठी काम करणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचे लक्ष्य आहे. या भागीदारी अंतर्गत १८० पेक्षा जास्त बालरोग तज्ञ ‘साची’च्या या नव्या उपक्रमाला सहयोग देत आहेत. प्रत्येक मुलाला, मग ते कोणत्याही समुदायातील किंवा कोणत्याही पार्श्वभूमीचे असो, त्याना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवल्या गेल्या पाहिजेत हे ‘साची’चे उद्धिष्ट आहे.

० ते १४ वर्षे वयोगटाचा एकूण लोकसंख्येतील हिस्सा २६% पेक्षा जास्त असलेल्या आपल्या देशात लहान मुलांचे आरोग्य हा मात्र दुर्लक्षिला गेलेला विषय आहे.  युनिसेफच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी २५० लाख बाळे जन्माला येतात, म्हणजेच संपूर्ण जगभरात वर्षभरात जेवढी बाळे जन्माला येतात त्यापैकी जवळपास एक पंचमांश हिस्सा भारताचा आहे.  ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या आव्हानात्मक काळात मौल्यवान जीव वाचवण्यासाठी दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करवून देणे अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्यसेवा उपलब्ध होण्याच्या आड येणाऱ्या बाधा दूर करण्यासाठी साचीच्या या नव्या उपक्रमाला अपोलो २४/७ प्लॅटफॉर्मसोबत जोडण्यात आले आहे. याठिकाणी १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गरजू मुलांना आपल्या घरूनच विविध केंद्रांमधून डिजिटल सल्ला मिळवता येऊ शकेल. यासाठी त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी अपोलो फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सीएसआर श्रीमती उपासना कामिनेनी कोनीडेला यांनी सांगितले, “डॉ संगीता रेड्डी या नेहमीच लहान मुलांच्या आरोग्याविषयी अतिशय जागरूक आणि संवेदनशील असतात. यासंदर्भातील त्यांच्या संकल्पना आणि आमच्या बालरोग तज्ञांकडून मिळत असलेला सहयोग यामुळे आम्हाला देशभरातील वंचित समुदायांमधील लहान मुलांना आरोग्यसेवा निःशुल्क पुरवण्यात मदत मिळत आहे. मुलांचे लसीकरण झालेले नसल्याने त्यांच्या आरोग्याला सर्वाधिक धोका आहे.  लिंक शेअर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देऊन आणि या उपक्रमाचे लाभ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचवून आपण देखील यामध्ये योगदान दिले पाहिजे. निरोगी राहा, सुरक्षित राहा. आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: