महाराष्ट्र

सिंधुताईंच्या अनाथालयाला आर्थिक मदतीचे आवाहन

अभयकुमार देशमुख
पुणे :
अनाथांची माई अर्थात पदमश्री सिंधुताई (sindhutai) सपकाळ यांचे कार्य फक्त महाराष्ट्रालाच नाही. तर संपूर्ण देशाला माहीत आहे. अनाथ मुलांचा पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळ करुन माई त्यांना आईची माया देतायंत. माईंच्या कार्याची दखल अनेक मोठ्या संस्था, नेत्यांनी घेतल्याचे आपल्याला माहितच आहे. माई महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाषण देऊन आपल्या मुलांसाठी लागणारा पैसा उभा करतात. मात्र कोरोना काळ सुरु झाला आणि माईंची भाषणे बंद झाली. भाषणांच्या बदल्यात मिळणारे पैसे बंद झाल्याचा परिणाम माई सांभाळत असलेल्या लेकरांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
सिंधुताईंच्या (sindhutai) एकूण सात संस्था असून पैकी सहा संस्थामध्ये अनाथ मुलं मुली आहेत तर एक संस्था गोरक्षण केंद्राची आहे.  कोरोना काळ सुरु झाला आणि आर्थिक चणचणीमुळे अन्न धान्य, औषधासाठी लागणारा खर्च मिळेनासा झाला. याचा परिणाम सद्यस्थितीत त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभारण्यात झाला.
माईनी अनाथ लेकरांची परवड दूर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली असून, समाजातील विविध घटकांनी या अनाथ लेकरांवर मायेचा हात ठेवण्याचे आवाहन सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: