कला-साहित्य

पोलिसांतील माणूस समजून घ्या जरा…

– अभयकुमार देशमुख

 

​पोलिस म्हटले की अनेकांच्या पोटात गोळा येतो. याचे कारणही तसेच आहे. पोलिस समोर दिसल्यानंतर मनात भिती निर्माण झाली नाही. तर ते पोलिस कसले. आपण पोलिसांवर आरोप झाल्याचे अनेक किस्से अगदी चवीने चघळतो. लगेच त्यांच्यावर तोंडसुख घेवून मोकळे होतो. ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय. त्यांच्याबद्दल खरं खोटं काय ? हे समजून न घेताच समस्त पोलिस खात्याचा उध्दार करुन टाकतो. आणि आपण पोलिसांच्या बाजुने कधीच विचार करत नाही. त्यांना जेवढे कोसता येईल तेवढे कोसतो. आणि आपल्या मनाला ज्या शांततेची गरज नसते ती आपण मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो.  पण वास्तवतेचा विचार न करता मांडलेली मते. कितपत योग्य असतात याचा आपण कधीच विचार करत नाही. पोलिस हे सर्वसामान्यांना कधीच त्रास देत नाहीत. हे वास्तव आपण का स्वीकारु शकत नाही. अर्थात चुकीचे वागतात त्या पोलिसांचे समर्थन करणे मलाही आवडणार नाही. पण,  पेटीतला एक आंबा नासका निघाला म्हणून सर्व आंबे नासकेच निघतील. असं समजणे म्हणजेच आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेला दोष देण्यासारखे आहे. म्हणूनच तोंडसुख घेताना पोलिसांची दुसरी बाजू समजून न घेणे. हा त्यांच्यावर नकळत केलेला अन्यायच म्हणावा लागेल.

मागील दहा वर्षाहून अधिक काळ मी पुणे, मुंबई, नाशिक, सातारा अशा वेगवेगळ्या शहरात ​पत्रकारिता करत आहे. पण मला पोलिसांची कधीच भिती वाटली नाही. कारण मला मी ज्या क्षेत्रात काम करतोय. त्या पत्रकारीतेमुळे पोलिस बांधवांची खरी बाजू समजून घेण्याची संधी मिळत गेली. पोलिसांना कठोर भूमिका का घ्यावी लागते. त्या मागचा त्यांचा हेतू काय आहे. त्या त्या​ ​परिस्थितीमध्ये पोलिसांना का कडक भूमिकेत यावे लागते. याचा बातमी करताना अनेकवेळा जवळून अभ्यास करता आला आहे. अनेक वेळा पोलिसांमधला देवमाणूस पाहता आला आहे. जिथे कोणी जाण्याचे धाडस करु शकणार नाही. अशा ठिकाणी ​जाऊन गुन्ह्याची उकल करण्याची धमक ही फक्त पोलिसांमध्येच असते हे सुध्दा पाहिले आहे. पोलिस हा आपल्या जिवावर ​उदार होऊन सर्वसामान्यांसाठी झटत असतो. ते आपल्या कुटुंबियांपेक्षा आपल्या कर्तव्याशी अधिक बांधिल दिसतात. याचे कारण ते करत असलेले सर्वसामान्यांचे रक्षण…

 

होय पोलिस हे फक्त करप्ट आणि ​कडू बोलणारेच आहेत. असे समजणे म्हणजे सर्वसामान्य लोकांनी आपले सरक्षंण करणा-यांवरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. पोलिसांना कोण घाबरते. तर जे नियमांचे उल्लघण करतात. त्यांनाच पोलिसांची भिती वाटत असते. पण अशा काही वृत्तीच्या लोकांमुळे काही सामान्य नागरीकही त्यांच्या सुरात सुर मिसळून सरसकट पोलिसांना नावं ठेवतात. पण त्यांच्या एक बाब लक्षात येत नाही. की तुम्ही संकटात सापडल्यानंतर तुमच्या मदतील सर्वात आधी पोलिस बांधवच येतात. आता कोरोना काळ सुरु झाल्यापासूनचाच विचार करा ना ? आपल्या घरच्यांची पर्वा न करता. आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी मागच्या एक वर्षापासून सर्वसामान्य लोकांसाठी किती मदत केली आहे.
कोरोना काळात तास न तास ड्युटीवर राहून एका वडापाववर दिवस काढून सर्व काही व्यवस्थित करण्याचे काम त्यांनी केले. आपण सर्वजण आपल्या जीवाची काळजी करत आपल्या परिवारासोबत घरामध्येच आपली ह्युमिनिटी पावर वाढवण्यात गुंतलेलो. तर पोलिस बांधव आपल्यापैकीच कोणाला या महामारीत त्रास होवू नये म्हणून रात्रदिवस रस्त्यावर उभे होते. हे सत्र अद्यापही सुरुच आहे. फक्त पोलिसांना नावे ठेवण्यात धन्यता ​मानण्यापेक्षा कधी तरी ते करत असलेल्या कामांबाबत कौतुकही केले पाहिजे.

आजही मी बातमी करण्यासाठी बाहेर फिरत आहे. तेव्हा मला पोलिस बांधव त्यांचे कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. उन असो, पाऊस असो, पोलिस बांधव आपल्या कर्त्यव्याप्रती रस्त्यावर उभे आहेत. कधी त्यांना वेळेत जेव​ण मिळत नाही. किती तास ड्युटी करावी लागेल याचीही त्यांना कल्पना नसते. पण त्यांनी आपले कर्तव्य नाकारल्याचे कधी दिसले नाही. काही पोलिस बांधवांवर आरोप झाले म्हणून सर्व पोलिस खातेच वाईट आहे. हा भ्रम करुन घेणे म्हणजे आपण आपले संरक्षण करणा- यांवर अविश्वास दाखवण्यासारखे होईल. त्यामुळे तुम्ही चुकीचे नसाल तर पोलिस बांधवही आपले मित्रच आहेत. हे लक्षात घेवून पोलिसांवर तोंडसुख घेणे थांबवा. एक पत्रकार म्हणून पोलिसांमधील देव माणसांबददल लिहणे माझे कर्तव्य आहे. म्हणून आजचा हा लेखनप्रपंच…

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: