सातारा 

‘अरविंद जाधव म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना”

शिवसेना उपतालुकाप्रमुख तानाजी चव्हाण यांचे प्रत्युत्तर 

सातारा (महेश पवार) :  
मालकांचे पाय चाटून मिळालेल्या संस्था, अध्यक्षपदाचा वापर करून प्रामाणिक शिक्षकांच्या पगारावर डल्ला मारून मालकांच्या आधाराने बांडगुळासारखे आयुष्य जगून पंचायत समिती सदस्य झालेले  जाधव आज दुसऱ्याच्या उसण्या पत्रकावर स्वतःच नावं टाकून मी आहे हे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांची हि अवस्था म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ अशीच असल्याचे प्रत्युत्तर  शिवसेना उपतालुकाप्रमुख तानाजी चव्हाण यांनी दिले आहे.
वास्तविक माझ्यासारख्या लहान परंतु प्रामाणिक व्यक्तीने देखील यांच्यावर बोलावे एवढी देखील यांची पात्रता नाही. मालकांच्या नावाखाली सामान्यांच्या घामाच्या पैश्यावर  दरोडे टाकणाऱ्या टोळीचे सदस्य असणाऱ्या जातकुळीचे आपण आहात.  प्रामाणिकपणा काय असतो हे आपल्याला सांगणे म्हणजे ….. गीता वाचण्यासारखे आहे. आपल्या स्वतःच्या गावातील कोरोनाचे रुग्ण या करंडी येथे सचिन मोहिते यांनी सुरू केलेल्या  कोरोना सेंटरवर बरे होऊन गेलेले आहेत. किमान हे तरी आपण लक्षात घेतले पाहिजे.
बाकी परळी भागातील जनतेने आपल्याला निवडून दिल्यानंतर आपण उभी केलेली  ४/५  वर्षातील विकासाची गंगा परळी भागातील जनता व आम्ही लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहोतच. या वयामध्ये आपण फार ताण घेऊ नका. तब्बेतीची काळजी घ्या. दिवस खराब आहेत. आणि जमलं तर मालकांनी पाठविलेले पत्रक येत्या दहा दिवसात पाठ करा आणि एकदाच सरसकट पत्रकारांच्या  कॅमेरासमोर न चुकता म्हणून दाखवा. शिवसेनेच्यावतीने आपल्या कुवतीनुसार ११ रुपये रोख व नारळ देऊन आपला सत्कार करू , असा टोमणादेखील यावेळी चव्हाण यांनी मारला.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: