महाराष्ट्र

‘महाआघाडीला जडला राजकारणाचा महारोग’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार धरता. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे, यांंना राजकारणाचा महारोग जडला आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार अँड शेलार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना भाजपा प्रदेश कार्यालयात केली.

शेलार यांनी यावेळी खा. संजय राऊत यांच्या टीकेचाही समाचार घेतला. “भूत आणि भूताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत? रोज नुसतं १२-१२ ची टिमकी वाजवली जातेय. तुमचे काय १२ वाजलेत का? भुतानं जर फाइल पळवल्याचं तुमचं म्हणणं असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही आज करत नाहीय. पण भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे राऊत यांनी लक्षात ठेवावं”, असा जोरदार टोला आशिष शेलार यांनी लगावला.

बार्ज दुर्घटना प्रकरणी शपूरजी पालनजीवर गुन्हा दाखल करा

अखिल भारतीय नाविक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफकाँन्सचे संचालक मंडळ आणि शापूरजी पालनजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार त्यांनी केली.

ashish shelar
आशिष शेलार

शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय नाविक संघटनेचे अध्यक्ष सुहास माटे, कार्याध्यक्ष अमोल जाधव, सरचिटणीस दिनानाथ जगाडे, उपाध्यक्ष जितेंद्र राऊत आणि राकेश चव्हाण यांच्यासह कामगार नेते मिलिंद तुळसकर यांचा यामध्ये समावेश होता. या प्रकरणात शापुरजी पालनजी यांच्या संचालकना वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील कुठला मंत्री त्यासाठी प्रयत्न करीत आहे? असा सवालही याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

या प्रकरणी कंपनीच्या डायरेक्टर का वर गुन्हा नाही. जो हजर नाही आपली बाजू मांडू शकत नाही अशा कँप्टनवर गुन्हा दखल केला गेला. हा डाव कुठल्या मजल्यावर शिजला हे मुख्यमंत्री सांगावे असा आरोप ही त्यांनी केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: