देश-विदेश

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचा राजीनामा

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरू असलेला संघर्ष आता टोकाला जाऊन पोहोचला असाताना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (ashraf ghani) पदाचा राजीनामा दिला आहे. तालिबानी हल्ल्यांना सामोरे जाताना देशाची राजधानी काबुलपर्यंत (Kabul) पोहोचले असुन, नागरिक मोठ्या विध्वंसाला सामोरे जाताना त्रस्त झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रपतींना सुखरूप देशाबाहेर नेण्यासाठी अमेरिकेची हेलिकॉप्टर्सही पोहोचली आहेत.

अफगाणिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अली अहमद जलाली यांना अशरफ घनी यांच्या जागी अंतरिम सरकारचे नवे प्रमुख बनवण्यात आले आहे. जलाली जर्मनीमध्ये अफगाणिस्तानचे राजदूत राहिले आहेत. यापूर्वी अशी बातमी आली होती की तालिबान राजधानी काबुलच्या दारात पोहोचला आहे. इथे पोहोचताच तालिबान्यांनी एक निवेदन जारी करुन शांततेच्या मार्गाने राजधानी आपल्या हातात हवी असल्याची मागणी केली आहे.

 

राष्ट्रपती भवनात तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तालिबान लढाऊ पुढील सूचनांसाठी काबुलच्या सीमेवर तैनात आहेत. अफगाणिस्तान उच्च परिषदेच्या राष्ट्रीय सलोख्याचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: