गोवा 

रायबंदर येथे साकारणार ‘आयुष’ रुग्णालय 

पणजी :
रायबंदरमधील जुन्या गोमेकॉ आवारात स्थानिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सार्वजनिकआरोग्य केंद्राच्या मागणीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र राज्य सरकारने आयुष रुग्णालयासाठी सदर जागा देण्याचा प्रस्ताव आज तातडीने मंजूर केला आहे.

रायबंदर येथील ‘गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (जीआयएम) बिल्डिंगमध्ये आयुष मंत्रालयाला जागा देण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी महसूल सचिव आयएएस संजय कुमार, मुख्य सचिवांचे सचिव अशोक कुमार, आयएएस, आणि उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर उपस्थित होते. लोलयेकर यांनी सांगितले की, शासनाने दरमहा प्रति चौरस मीटर 100 रुपये नाममात्र भाडे आकारून 30 वर्षांच्या मुदतीसाठी जागा देण्याचे ठरविले आहे. गोव्यातील लोकांच्या हितासाठी आयुष रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रक्रिया वेगवान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आयुषमंत्री व अन्य संबंधित अधिकार्‍यांना केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: