गोवा 

‘सुखकर प्रवासासाठी ‘कदंबा’चा घ्या लाभ’

पेडणे (प्रतिनिधी) :
आपत्कालीन स्थिती असो किंवा कोणत्याही स्थितीत सरकार जनसेवेसाठी कार्यरत असतात , सरकारच्या योजना फक्त ह्या जनतेसाठी असतात , जशी कदंबा बस सेवा आहे , या सेवेचा जनतेने जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घेवून आपला प्रवास सुखकर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी वारखंड येथे कदंबा बस सेवेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते .

यावेळी तोरसे जिल्हा पंचायत  सदस्य सीमा खडपे , वारखंड सरपंच संजय तुळसकर , माजी सरपंच मंदार परब , पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस ,आबा तळकटकर आदी नागरिक उपस्थित होते .

​वारखंड व्हाया पेडणे व्हाया पणजी अशी हि बसवाहतूक सेवा कार्यानिवीत करण्यात आली आहे . कोरोना महामारीच्या काळात खाजगी बस वाहतूक सेवाही ठप्प झाली होती , नागरिकाना आपापल्या दैनदिन कामासाठी जातात वाहतूक सेवा नसल्याने गैरसोय होत होती .या विषयी नागरिकांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे मागणी केली . मंत्री आजगावकर यांनी सरकारकडे मागणीचा पाठपुरावा करत कदंबा बस सेवेला हिरवा कंदील मिळवून घेतला . आता जी सेवा उपलब्ध केलेली आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यायला हवा , जनतेच्या योजना जनतेला मिळाव्या व त्या उपयोगात याव्यात असे मंत्री आजगावकर म्हणाले.

पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी बोलताना सरकारने जनहितासाठी हि कदंब बससेवा चालू ठेवली आहे ,या सेवेत सरकारला आर्थिक तोटा होत आहे ,पण सरकार जनतेसाठी या सेवा अखंडितपणे सुरूच ठेवलेल्या आहेत असे सांगून या सेवेचा लाभ घेवूया असे सांगितले.

जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे यांनी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी मतदार संघाचा चौफेर विकास केला आहे , जनसेवेसाठी तप्तर असेलेल्या मंत्री आजगावकर याना उर्वरित प्रकल्प पूर्ण कण्यासाठी पुन्हा एकदा निवडून आणावे लागेल असे त्यांनी सांगितले.

सरपंच संजय तुळसकर यांनी यावेळी प्रास्ताविक स्वागत केले .

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: