गोवा 

‘मतदारसंघातील प्रत्येक घरात एक नोकरी देणार’

पेडणे (प्रतिनिधी) :
मतदार संघात होवू घातलेल्या प्रकल्पातून मतदार संघातील प्रत्येक घरात किमान एक रोजगार , नोकरी देण्याची क्षमता आहे , आणि प्रत्येक घरात हि नोकरी पोचवण्यासाठी परत एकदा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे सरकारी विश्रामधाम येथे ६ रोजी पेडणे मतदार संघातील एकूण १५६ लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत लाभार्थ्याना मंजुरी पत्र दिल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर , पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर , नगरसेविका तृप्ती सावळ देसाई , नगरसेवक विष्णू उर्फ बाप्पा साळगावकर , धारगळ माजी सरपंच प्रदीप नाईक , चांदेल सरपंच संतोष मळीक, कोरगावचे पंच अब्दुल नाईक , समील भाटलेकर ,नगरसेविका विशाखा गडेकर ,प्रकाश कांबळी , आदी उपस्थित होते .

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना जर आपल्याकडून जर एकद्यावेळी आपल्या हातून चूक झाली तर आपण चूक मागतो आपल्याला क्षमा करा मात्र आपल्याला दूर करू नका ,विकासाठी आणि उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी परत एकदा आम्हाला संधी द्या असे आवाहन केले. मोपा विमानतळात जे रोजगार उपलब्ध होणार त्यासाठी पूर्व प्रशिक्षण दिले जाईल असे मंत्री आजगावकर यांनी सांगितले .

पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी बोलताना या भागाचे आमदार आणि मंत्री विकासाला साथ देत आहेत ,या योजना केवळ भाजपाच सरकार करू शकतात , गरिबांची आणि गरजवंताची गरज लक्षात घेवून सरकार योजना तयार करतात ,विविध समाजाच्या हितासाठी या योजना कार्यरत आहेत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत योजना पोचवल्या जातात.  आरोग्य , रोजगार मदत सरकार करतो ,

काहीजण विरोधक टीका करतात कि हे पैसे जनतेचे सरकार वाटतो वेगळ काय करतो? ,त्यावर तुळसीदास गावस यांनी बोलताना पैसा जनतेचा आहे मात्र तो जनतेकडे कसा जाईल तश्या प्रकारच्या योजना फक्त भाजपा सरकारच करू शकतो असे सांगून जनतेच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या सरकारला परत एकदा संधी देण्याचे आवाहन गावस यांनी केले .

जनतेचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी केवळ भाजपा सरकारची गरज आहे आणि सरकार स्थापन करण्यासाठी २१ आमदारांची गरज आहे आणि चाळीसही मतदार संघात निवडणूक लढवण्याची केवळ भाजपचीच क्षमता आहे , त्यामुळे पुढेही भाजपलाच बहुमत मिळणार असा विश्वास व्यक्त केला .

पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना महिलाना सन्मान देणारे हे सरकार आहेत आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर मतदार संघातील जनतेचा विकास करण्यासाठी त्याना योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत . कोरोना महामारीच्या काळातही संकटकाळी सरकार मदत करत लाडली लक्ष्मी योजना लाभ मिळवून दिला आहे . मंत्री आजगावकर सतत सामान्य नागरिकांचा विचार करतो ,टीका आणि जे कोणी अपप्रचार करतात त्यांच्यवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले .

हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी बोलताना विकासाला प्राधान्य देणाऱ्या आमदारासोबत जनता राहते , मतदार संघाच्या विकासासाठी ते वेळप्रसंगी सरकारबरोबर भांडून विकास करून  घेतो , शिवाय राज्याच्या मुख्यमंत्र्याला पूर्ण दिवस पेडणे मतदारसंघात घेऊन विकासावर चर्चा करणे  नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याची धमक त्यांच्यात आहेत असे सांगितले.

सरपंच संतोष मळीक व कोरगाव पंच अब्दुल नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: