सातारा 

अखेर बजरंग केंजळेवर कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश…

सातारा (महेश पवार ) :

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संलग्न असलेल्या केडर सचिवांच्या सोसायटी कर्ज घोटाळा प्रकरणी तसेच बनावट दाखले देऊन , स्टेट बँक ऑफ इंडिया कोरेगाव शाखेतील कर्ज घेऊन सचिव पदावर असताना पदाचा दुरूपयोग केला ही बाब विचारात घेऊन केडर मार्फत बजरंग केंजळे ला कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले.


बजरंग केंजळे हे कण्हेर खेड विकास सेवा संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत असताना सदर संस्थेमध्ये त्यांनी बोगस दाखले दिले आहेत का ? याबाबत ही चौकशी होणार आहे . या चौकशीत जर दोष आढळल्यास संबंधित सचिव बजरंग केंजळे वर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . तर चौकशी होई पर्यंत बोनस पगार बक्षीस हे थांबवण्यात आले असल्याचे राष्ट्रमतला दिलेल्या खुलाश्यात मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी कळवले आहे.

किशोर शिंदे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई केली गेली असुन यासंदर्भात बॅंकेच्या वतीने नाबार्ड कळवले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: