देश-विदेश

बंगालची वाघीण दिदीच…

तृणमूलने पार केला बहुमताचा आकडा

नवी दिल्ली :
आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये (Bangal Election Result) तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपाला खूप मागे टाकले आहे. एक वेळ अशी होती की तृणमूल आणि भाजपा समसमान जागांवर आघाडीवर होते. परंतू आता हे अंतर मोठे होऊ लागल्याने तृणमूलच्या गोटात आनंदाचे वातावरण परतू लागले आहे.
सध्याच्या कलांनुसार भाजपाला 98 जागांवर आघाडी मिळाली असून तृणमूल काँग्रेसला 188 जागांवर आघाडी मिळाली आहे. म्हणजेच तृणमूलने भाजपाला जवळपास 90 जागांनी मागे टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांची गरज आहे. येथे 294 पैकी 292 जागांवर मतदान झाले आहे. (Bangal Election Result)
दुसरीकडे ऐन निवडणुकीत एका छोट्या अपघातात जायबंदी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पिछाडीवर आहेत. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना 8106 मतांनी मागे टाकले आहे. यामुळे सध्या बंगालमध्ये ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
Bangal Election Resultदेशभरात आजचा दिवस कोरोना काळातील हायव्होल्टेज निवडणुकांच्या निकालाचा आहे. निवडणूक आयोगाने कोणीही जल्लोष करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही ही निवडणूक भाजपासाठी मोठा जल्लोष करण्यासारखी असणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये 3 वरून तीन आकडी जागा मिळविताना ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि त्यांच्या सत्तेचे पतन अशा दोन गोष्टी भाजपाला साधण्याची संधी चालून आली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: