देश-विदेश

बसवराज बोम्मई कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी

​बंगळुरू :
मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकिय घडामोडीला अखेर नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने ब्रेक लागला. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांनी शपथ घेतली आहे. केंद्रीय निरिक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी केली. मुख्यमंत्री बोम्मई कर्नाटकातील बहुसंख्य लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. येडीयुरप्पा यांनी बसवराज बोम्मई यांचे नाव मुख्यमत्री पदासाठी पक्षश्रेष्ठींना सुचवल होतं असं सांगण्यात येत आहे. बसवराज बोम्मई यापूर्वी जल संपदा मंत्री होते त्यानंतर त्यांनी गृहमंत्री पद भूषवले.

 

विशेष म्हणजे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे सुपुत्र आहेत. अर्थात आधी वडील आणि नंतर मुलगाही मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारी ही दुसऱी घटना आहे. त्यांच्या आधी जेष्ठ नेते एच. दी. देवेगौडा आणि डी. कुमारस्वामी या दोघा पिता पुत्रांनीकर्नाटकचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. भाजपमध्ये अतिशय वेगाने वर गेलेल्या नेत्यांपैकी एक बसवराज बोम्मई आहेत. बोम्मई यांची राजकिय कारकिर्दीची सुरुवात ही जनता दलातून झाली झाली होती. त्यानंतर त्यांनी ते 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयावर सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये ते प्रामुख्याने कारवारमध्ये निर्माण झालेल्या पूर स्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर संपूर्ण राज्यातील पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बसवराज बोम्मई यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. तसेच आपण तात्काळ दिल्लीला जाणार आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: