क्रीडा-अर्थमत

बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडियाची नोंदणी सुरु

मुंबई :
क्राफ्टन या प्रमुख दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम डेव्‍हलपर कंपनीने आज बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडियासाठी पूर्व-नोंदणी करण्‍याची घोषणा केली. क्राफ्टनद्वारे विकसित गेमसाठी पूर्व-नोंदणी भारतातील चाहत्‍यांसाठी गुगल प्‍ले स्‍टोअरवर सुरू आहे.

बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडियासाठी पूर्व-नोंदणी करणा-या खेळाडूंना ४ अद्भुत रिवॉर्डस् रिकॉन मास्‍क, रिकॉन आऊटफिट, सेलिब्रेशन एक्‍स्‍पर्ट टायटल आणि ३०० एजी मिळतील. हे रिवॉर्डस् विशेषत: पूर्व-नोंदणी करणा-या चाहत्‍यांसाठीच आहेत. खेळाडू सोप्‍या पाय-यांचे पालन पूर्व-नोंदणी करू शकतात. बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडियासाठी पूर्व-नोंदणी करण्‍याकरिता कृपया गुगल प्‍ले स्‍टोअर लिंकला भेट द्या आणि ”प्री-रजिस्‍टर” बटनावर क्लिक करा. तुमचे रिवॉर्डस् गेम लाँचदरम्‍यान क्‍लेम करण्‍यासाठी आपोआपपणे उपलब्‍ध होतील.

व्‍हर्च्‍युअल विश्‍वामध्‍ये सेट करण्‍यात आलेला बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडिया हा बॅटल रॉयल गेम आहे, जे‍थे विविध खेळाडू डावपेच आखत युद्ध करतात आणि विजयी ठरण्‍याचा प्रयत्‍न करतात. फ्री-टू-प्‍ले, क्राफ्टनकडून मल्‍टीप्‍लेअर अनुभवासह खेळाडू विविध गेम मोड्समध्‍ये युद्ध करू शकतात, जे स्‍कॉड-आधारित किंवा वन-ऑन-वन देखील असू शकतात. व्‍हर्च्‍युअल सेटिंगमध्‍ये विविध प्रदेशासह वैविध्‍यपूर्ण मॅप्‍स असलेला बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडिया ३डी साऊंड असलेल्‍या काल्‍पनिक विश्‍वाचा अनुभव देण्‍यासाठी अनरिअल इंजिन ४ चा वापर करतो, ज्‍यामधून मोबाइलवर सर्वोत्तम गेमिंग अनुभव मिळतो.

गेमचा अनुभव घेण्‍यासाठी शिफारस करण्‍यात आलेली सिस्टिम अँड्रॉईड ५.१.१ किंवा त्‍यापेक्षा अधिक क्षमतेची असली पाहिजे आणि मोबाइल डिवाईसमध्‍ये किमान २ जीबी रॅम असावी.  तुमच्‍या आवडीचा मॅप व मोड निवडा आणि थरारक राइडचा अनुभव घ्‍या. रोमांचपूर्ण अनुभव देण्‍यासोबत बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडिया हे बुद्धीकौशल्‍य पणाला लावण्‍याचे देखील बॅटल आहे. तुम्‍हाला मित्रांसोबत किंवा एकट्याने डावपेच आखत शत्रूंचा सामना करावा लागतो आणि विजयी ठरण्‍यासाठी त्‍यांचा पराभव करावा लागतो.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: