महाराष्ट्र

स्वस्त धान्य दुकानदारांकडून ग्राहकांची अडवणूक

'वंचित'च्या युनूस शेख यांनी केला थेट आरोप

बीड:
बीड शहर व ग्रामीण, तसेच संपूर्ण जिल्ह्यातील शहरात रेशन कार्ड धारकाची डेटा इंट्री बंद असल्यामुळे  शहरातील गोरगरिबांना रेशन दुकानदार रेशन देत नाहीत. त्यातच सध्या कोरोनामुळे बीडसह महाराष्ट्रात लाॅकडाउन असल्यामुळे गोरगरिबांचे हाल होत आहेत. शासनाकडून दिला जाणारा मोफतचा शिदाधान्य तरी कार्डधारकांना मिळेल म्हणून डेटा एन्ट्री आवश्यक असल्याचे निवेदन  वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष युनूस शेख यांनी जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारी यांना देत, सदर डेटा इंट्री सुरु करण्यात यावी असे आवाहन केले आहे.
beed lockdown
युनूस शेख

सर्वसामान्यांना जनतेला रेशन मिळेल. त्यासाठी लवकरात लवकर डेटा इंट्री  सुरु करण्यात यावी. डाटा इंट्री नसल्याचे कारण पुढे सांगून, स्वस्तधान्य दुकानदार जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करून आलेला स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करत असल्याचा आरोप यावेळी युनूस शेख यांनी करत जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रश्न त्वरित मार्गी लावला अशी मागणी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: