google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

7 रोजी भाई मावजो यांचा भव्य नागरी सत्कार

मडगाव:

साहित्य जगतात प्रतिश्टेचा असलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने 2022 साली ज्येष्ठ साहित्यीक दामोदर ऊर्फ भाई मावजो यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्त भाई मावजो यांचा भव्य नागरी सत्कार 7 मे 2022 दिवशी रवीन्द्र भवन, मडगांव येथे होणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.


या सत्कार सोहळ्यास जेश्ठ पत्रकार व द हिन्दू पब्लिशिंग ग्रुपचे संचालक एन. राम मुख्य अतिथी म्हणून हजर राहतील. जेश्ठ साहित्यीक ॲड. उदय भेंब्रे, लेखक व अनुवादक जुझे लोरेन्सो तसेच उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेंकार या वेळी दामोदर मावजो यांच्या जीवन व कार्यावर विचार व्यक्त करतील.


कोवीड परिस्थिती असल्याने जानेवारींत आयोजीत केलेला हा सोहळा आयोजकांना पुढे ढकलावा लागला होता. मात्र आता मोठ्या उत्साहाने आयोजीत केलेल्या या सत्काराच्या सोहळ्यास गोवेकरांनी मोठ्या संख्येने हजर राहून दामोदर मावजो यांना मिळालेला हा पुरस्कार साजरा करावा असे आवाहान आयोजकांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!