सिनेनामा

​बिग​ बी झाले सनी लियोनीचे शेजारी

मुंबई​ :
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनयासाठी जितके प्रसिद्ध आहेत तितकेच ते त्यांच्या प्रॉपर्टीसाठीही प्रसिद्ध आहेत. कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असतानाच अमिताभ यांनी आता मुंबईत आणखी एक महागडे डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. ओशिवरा परिसरात खरेदी केले असून या घराची किंमत तब्बल 31 कोटी रुपये आहे. मुद्रांक शुल्का​पोटी त्यांनी तब्बल 62 लाख रुपये भरले असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईत नवे घर खरेदी केले होते. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईमध्ये नवे घर खरेदी केल्याचे समोर आले आहे. बच्चन यांनी खरेदी केलेले घर हे सनी लिओनीच्या घराशेजारी असल्याचे बोलले जात आहे.

अमिताभ बच्चन यांनी डिसेंबर 2020 मध्ये नवीन घर खरेदी केली आहे. जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसराजवळील ओशिवरा येथील अटलांटिस या इमारतीमध्ये हे घर खरेदी केले आहे. या घराची नोंदणी एप्रिल 2021 मध्ये करण्यात आली आहे. अमिताभ यांनी खरेदी केलेले हे घर 27व्या आणि 28व्या मजल्यावर असून ते ​​5  हजार 184 क्वेअर फीट आहे. तसेच त्यांना 6 गाड्या पार्किंगची जागा देण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: