सिनेनामा

बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन

मुंबई :
कोरोनाच्या फटक्याने आणखी एका अभिनेत्याला काळाच्या पडद्याआड नेलं. लोकप्रिय अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल (Bikramjeet Kanwarpal) यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिक्रमजीत कंवरपाल यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज गाजले आहेत.
कोरोना संसर्गानंतर उपचार सुरु असताना बिक्रमजीत कंवरपाल यांची प्राणज्योत मालवली. पेज थ्री, रॉकेट सिंग, गाझी अटॅक, टू स्टेट्स यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. स्पेशल ऑप्स या वेब सीरीजमधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती.
चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विटरवरुन बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. “गुणी अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोना संसर्गाने आज सकाळी निधन झाल्याची दुःखद वार्ता समजली. निवृत्ती सैन्य अधिकारी कंवरपाल यांनी अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांचे सांत्वन” असे ट्वीट अशोक पंडित यांनी केले आहे.
बिक्रमजीत कंवरपाल यांनी 2003 मध्ये सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर अभिनयात पदार्पण केलं. पेज थ्री, रॉकेट सिंग – सेल्समन ऑफ दि इयर, आरक्षण, मर्डर टू, द गाझी अटॅक, टू स्टेट्स यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. दिया और बाती हम, ये है चाहते, दिल ही तो है, अनिल कपूर यांची 24 या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!