देश-विदेश

‘भारतासारख्या देशांच्या हाती देऊ नये लसींचा फॉर्म्युला’

वॉशिंग्टन :
​भारतासारख्या ​विकसनशील देशांच्या हाती लसींचा फॉर्म्युला देण्यात येऊ नये. असं मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य करताना भारताचं नकारार्थत्मक उदाहरण दिलं आहे.
स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये गेट्स यांना करोना लसीकरणासंदर्भातील स्वामित्व अधिकार म्हणजेच इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्ससंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. लसी बनवण्यासंदर्भातील माहितीवर असणारा स्वामित्व अधिकार रद्द करुन जगभरातील अनेक देशांबरोबर ती माहिती शेअर करावी का?, असं केल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये लसींचा पुरवठा वेगाने होईल असं वाटतं का?, असा प्रश्न गेट्स यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना गेट्स (Bill Gates) यांनी, “नाही” एवढचं म्हटलं.पुढे आपली भूमिका स्पष्ट करताना गेट्स यांनी भारताचाही उल्लेख केला. “जगामध्ये लसनिर्मिती करणाऱ्या अनेक संस्था आहेत. सर्वचजण लसींच्या सुरक्षेसंदर्भात फार गंभीर आहेत. असं असलं तरी करोना लसीचा फॉर्म्युला इतर देशांना सांगितला जाऊ नये असं मला वाटतं. अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे निर्मिती केंद्र आणि भारतातील लसनिर्मिती केंद्रात फरक आहे. आपण लस आपल्या पैशांनी आणि तज्ज्ञांच्या मदतीने निर्माण करतो,” असं गेट्स म्हणाले. म्हणजेच लस बनवणे हे फार जबाबदारीचं काम असून विकसनशील देशांकडून ते जबाबदारीने पार पाडलं जाईल की नाही यासंदर्भात गेट्स यांनी आपल्या वक्तव्यातून शंका उपस्थित केली.
लसीचा फॉर्म्युला हा काही एखाद्या रेसिपीसारखा नाहीय की जो कोणासोबतही शेअर करता येईल. तसेच लसीचा फॉर्म्युला हा केवळ बौद्धिक संपत्तीचा किंवा स्वामित्व अधिकाराचा प्रश्न नाहीय. लस बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. अनेक प्रयोग करावे लागतात. लसींची अनेकदा तपासणी आणि चाचण्या कराव्या लागतात. लस बनवताना प्रत्येक गोष्ट खूप काळजीपूर्वक हाताळावी आणि पडताळून घ्यावी लागते, असंही गेट्स (Bill Gates) यांनी म्हटलं आहे.बिल गेट्स यांनी पुढे बोलता श्रीमंत देशांनी आधी स्वत:च्या देशात लसीकरणाला प्राधान्य दिल्याबद्दल आपल्याला अजिबात आश्चर्य वाटलं नाही असं म्हटलं आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ३० वर्षांच्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जात आहे हे योग्य आहे. मात्र दुसरीकडे ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमधील ६० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण झालेलं नाही हे लक्षात घ्यायला हवं. करोना संकटामुळे परिस्थिती गंभीर झालेल्या देशांना दोन ते तीन महिन्यांमध्ये लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा गेट्स (Bill Gates)यांनी व्यक्त केलीय. एकदा विकसित देशांमधील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ते देश इतर देशांना लसी पुरवतील असं गेट्स यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.​
Bill Gates
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: