सातारा 

‘पाचगणी’त मिळकतीचा कोट्यवधींचा घोटाळा ?

सातारा (महेश पवार) :
पाचगणी नगरपालिकेने त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असणारी मिळकत ही मुदत संपलेली असताना मुंबई मधील एका व्यावसायिकाने भूमी अभिलेख कार्यालयाला हाताशी धरून कोणतेही कागदपत्रे नसताना बोगस वारस नोंद करून मिळकतीवर स्वतःचे नाव नोंद केले. नंतर ही बोगस नोंद घेऊन सदर व्यावसायिकाने नगरपालिकेतील अधिकारी यांच्याशी संगनमत करुन त्या ठिकाणी बांधकाम परवानगी मागणी केली, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने सदर मिळकत या व्यावसायिकाच्या नावे करून देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला व नगरपालिकेची मिळकत या व्यावसायिकाच्या घशात घातली.

कायदा काय म्हणतो :
नगरपालिका औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ कलम ५८ ग ४ नुसार अध्यक्षाला भाडेपट्टा मिळकतीची विक्री, अथवा मुदत वाढवून देण्याचे अधिकार नाहीत.
तसेच कलम ९२ नुसार राज्य शासनाच्या पूर्व मंजुरी शिवाय  नगरपालिका मिळकतीवर पक्के बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार नाहीत.
या ठरावा नुसार महाबळेश्वर तहसीलदार यांनी मिळकत नोंदीसाठी प्रतिज्ञापत्र दिले.
तरी नगरपालिकेने सदर मिळकतीवर जर ना हरकत दिला नव्हता तर शासकीय अभिलेख मध्ये फेरफार केल्याबाबत फौजदारी गुन्हा नोंद करणे बंधनकारक होते परंतु सदर कृत्य हे criminal conspiracy असल्याने यामध्ये जाणीवपूर्वक कारवाई झाली नाही.
अशा प्रकारे नगरपालिकेचा  कोट्यावधींचा भुखंड मुंबई मधील व्यावसायिकाच्या पदरात पडला.
फक्त स्थानिक म्हणुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली रस्त्यासाठी सर्व पुरावे कागदपत्रे असताना रस्त्यासाठी नगरपालिका सर्वसामान्यांना कायदा शिकवते परंतु बाहेरील व्यावसायिकांना कोट्यावधींचा फायदा मिळवून देण्यासाठी नगरपालिका अधिकारांचा गैरवापर करते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: