गोवा 

भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

पणजी :
पेडणे, साळीगाव आणि पर्वरी मतदारसंघातील भाजपा आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आज प्रदेश संयोजक राहुल म्हांबरे आणि प्रदेश सहसंयोजक सुरेल तिळवे यांच्या उपस्थितीत गोवा आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.
साळीगाव मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप पेडणेकर यांनी दोन दशकांहून अधिक काळ भाजपासाठी काम केल्यानंतर आपल्या समर्थकांसह आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. पेडणेकर हे भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत, आणि 2004 मध्ये कंळगुट मंडळाचे युवा अध्यक्ष होते.

पेडणेकर हे एक प्रसिद्ध समाजसेवक आणि व्यावसायिक आहेत आणि सध्या ते पेडणेमधील गाडेवंश रामपुरुष मंदिराचे उप कोषाध्यक्ष आहेत. पेडणेकर यांच्या पत्नी प्रगती गोमंतक भंडारी समाजाच्या बार्देझ तालुका उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी नुकतीच रेशमागोस जि.प. मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.

पेडणेकर म्हणाले की, जवळपास भाजपाने दशकभर सत्तेची चव घेतल्यानंतर त्यांनी सामान्य माणसाची काळजी घेणे त्यांनी थांबवले आहे, ज्याच्या मतदानामुळे ते सत्तेत आले होते आणि म्हणून मी आपमध्ये प्रवेश केला.

जनमानसात भाजपबद्दल तीव्र संताप असल्याचे पेडणेकर यांनी नमूद केले आणि गोव्याची आणि सर्वसामान्यांची नवीन आशा म्हणून आप बाबत लोकांमध्ये चर्चा होत असल्याने ते आपमध्ये सामील झाले.

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीत झालेल्या कार्यामुळे प्रेरणा मिळाल्यानंतर पेडणे मतदारसंघातील कॉंग्रेसचे युवा नेते राकेश बोंद्रे आज आम आदमी पार्टीत दाखल झाले.

बोंद्रे हे कॉंग्रेस सेवा दलाचे गोवा युवा ब्रिगेड संयोजक होते आणि पूर्वी उत्तर गोवा ब्लॉक समितीचे ते भाग होते. बोंद्रे हे पेडणेच्या कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष आणि पेडणे नगरपालिकेच्या माजी सभापती प्रीती बोंद्रे आणि कॉंग्रेसचे पीसीसी सदस्य दिवंगत विठ्ठल बोंद्रे यांचे पुत्र आहेत.

प्रमोद शेटगांवकर, इद्रीस खान, शुभांगी अरोळकर, जमीर खान आणि राजू तारकर या समर्थकांसमवेत राकेश  यांनी आप मध्ये प्रवेश केला.

पर्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते विग्नेश आपटे जे अनेक वर्षे भाजपासाठी तळागाळात काम करत होते. ते आज आम आदमी पार्टीत दाखल झाले. एचआर सर्व्हिसचा व्यवसाय करणारे आपटे म्हणाले की, आपचे महामारी दरम्यानचे रेशन वितरण, डॉक्टर हेल्पलाईन, ऑक्सिजन केंद्रे, ऑक्सिजन सिलेंडर्स इत्यादी मोठ्या प्रमाणात केलेले मदतकार्य पाहून ते प्रभावित झाले.

आपटे म्हणाले की, केवळ एक राजकीय पक्ष असूनही आम आदमी पक्षाने, निवडून आलेले आमदार किंवा भाजपा सरकारने कोरोना काळात जे काही केले त्यापेक्षा जास्त काम सामान्य माणसा करता केले. आपटे म्हणाले की, आपण पक्षासाठी काम करु जेणेकरून राज्यात राज्य करण्याची संधी आपला मिळू शकेल, कारण भाजपा किंवा कांग्रेस जे मागील सात वर्षात करू शकली नाही त्यापेक्षाही जास्त लोकाभिमुख काम ‘आप’ सरकार सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी व राज्यासाठी करू शकेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: