पुणे 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल 

पुणे (अभयकुमार देशमुख) :
येथील भाजपचा स्थानिक नगरसेवक आनंद रिठे याने दत्तवाडी येथे जुन्या सायकली दुरुस्त करणाऱ्या व्यावसायिकाच्या घरावरील मोबाईल टॉवर पाडून तसेच घरही पाडण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्यामुळे संजय सुर्वे या व्यावसायिकाने सायकलच्या दुकानांमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी येथे घडली.
याप्रकरणी संजय सुर्वे यांचा मुलगा शशांक संजय सुर्वे यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन भाजप नगरसेवक आनंद रमेश रिठे (रा. साईबाबा मंदिराजवळ, दत्तवाडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, जाणीवपुर्वक अपमानित करुन मानसिक त्रास देणे व धमकी देणे, या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सुर्वे यांचे म्हसोबा चौकामध्ये “पौर्णिमा सायकल मार्ट’ नावाचे जुन्या सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. सुर्वे यांनी त्यांच्या मालकीच्या “महादेव बिल्डींग’च्या छतावर जिओ मोबाईल कंपनीचा नवीन टॉवर बसविला होता. सुर्वे हे दत्तवाडी प्रभाग क्रमांक 29 मध्ये राहात असताना प्रभाग क्रमांक 30 चे नगरसेवक आनंद रिठे याने महापालिकेकडून टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र सुर्वे यांनी रिठे यास पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्याने महापालिकेकडे अर्ज करून नगरसेवकपदाचा गैरवापर करून फिर्यादीच्या वडीलांच्या बिल्डींगच्या छतावरील रिलायन्स कंपनीचा नवीन टॉवर महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फौजफाटा आणून 10 जुन रोजी काढून टाकला. त्यानंतर सुर्वे यांचे राहते घर देखील पाडून टाकणार अशी धमकी देऊन फिर्यादीच्या वडीलांना रिठे याने सतत मानसिक त्रास दिला.

anand rithe
आनंद रिठे

रिठे याच्या सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून व फिर्यादीच्या वडीलांच्या बिल्डींगवरील टॉवर काढल्याची मानहानी सहन न झाल्याने व घर पाडण्याच्या चिंतेने फिर्यादीचे वडील संजय सुर्वे यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या पौर्णिमा सायकल नावाच्या सायकल दुरूस्तीच्या दुकानामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुर्वे हे नेहमी सकाळी आठ वाजता त्यांचे आवरुन दुकानामध्ये जात होते. मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारासच ते दुकानामध्ये आले. तेथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. साडे सहा वाजण्याच्या सुमारास दुकानामध्ये वृत्तपत्र टाकण्यासाठी आलेल्या मुलाच्या निदर्शनास हा प्रकार आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: