गोवा 

भाजपाचा निवडणूक प्रचार सुरू

प्रदेशाध्यक्षांचा साखळीत झंझावाती दौरा, कार्यकर्त्यांत उत्साह

आमोणे :
भाजपाने २०२२ मधील विधानसभा प्रचारास आजपासून सुरवात केली. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्यास मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणे येथून केली. स्थानिक आमदार या नात्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भाजपाने नेहमीच येथून प्रचाराची सुरुवात केली आहे. पूर्वाश्रमीच्या पाळी मतदारसंघातून भाजपाच्या प्रचाराची सुरुवात केली जात असे. २०१२ च्या निवडणुकीत प्रचार येथून‌ सुरू केला होता. प्रदेशाध्यक्ष राज्यव्यापी दौरा करतील आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. सर्वांनी त्यांना सहकार्य करावे.

तानावडे म्हणाले, एका पक्षाने मुख्यमंत्र्यांवर आरोप केले त्यावेळी साखळीतील कार्यकर्त्यांनी आपले मुख्यमंत्र्यांवरील प्रेम दाखवले आहे. मुख्यमंत्रीही राज्यव्यापी राजकीय दौरा करणार आहेत. भाजपला राज्यात अनुकूल वातावरण आहे.
यावेळी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, सरपंच आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: