मुंबई 

भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर…

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची ते पाहणी करत आहेत. कोकण किनारपट्टी भागाला या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे, बागायतींचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून वादळग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आज भाजपकडून हात मदतीचा या अभियांतर्गत ट्रक मदतसामुग्री आज पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं.

जिल्ह्यातील तौक्ते चक्रिवादळ नुकसानग्रस्त पालघर वासियांना भाजपाच्या आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी यांच्या पुढाकाराने पत्रे, ब्लँकेट, बल्ब आणि विविध उपयोगी साहित्याचा ट्रक पालघरला पाठविण्यात आला आहे. त्यावर दरेकर म्हणाले. विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही संकट काळात कोकणवासीयांना मदत करत आमची जबाबदारी पार पाडत आहोत.  राज्यात अनेक संकट आले असून मुंबई  शहराने अनेक संकट झेलली असून याच संकटातून मुंबई उभी राहिली आहे, आणि इतरांना उभं करण्याच काम केलं आहे, ही आपली संस्कृति, परंपरा असल्यामुळे परत एकदा आपण सर्वांनी मिळून काम करूया, मदतीचा विश्वास लोकांना देऊया असे विधान दरेकर यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.

दरेकर म्हणाले, संकट काळात आज भाजपेचे कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करत आहे, कधीकाळी शिवसेना गोरगरिबांसाठी लढत असून मदतीचा हात शिवसेना शाखा प्रमुख अध्यक्ष, नगरसेवक यांच्याहस्ते मदत करताना दिसून यायची परंतु आज शिवसेनेची ती सामाजिक बांधिलकी दिसून येत नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोकणमध्ये नितेश राणे यांच्या मार्फत २ ट्रक पत्रे आणि कवलं कोकणवासीयांना देण्यात आली. अजूनही सामान भाजप नुकसानग्रस्त लोकांसाठी पाठवत आहे, शेवटी हा आधार संकट काळात राज्यसरकारकडून मिळणं आवश्यक आहे परंतु तोच आधार, मदत भाजप देत आहे. भाजपमध्ये सर्व आमदार, कार्यकर्त्यांना माणुसकी, सामाजिक बांधिलकी आहे याचा मला अभिमान आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: