गोवा 

भाजप महिला मोर्चाची उद्या राज्य कार्यकारिणी बैठक 

पणजी (प्रतिनिधी) :

भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानती श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रविवारी (ता.८) दिवसभर चालणार आहे. पणजीत गोमंतक मराठा समाज सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत ही बैठक होणार आहे.

मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस सुखप्रीत कौर यांचे या बैठकीच्या निमित्ताने आज गोव्यात आगमन झाले. त्यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यालयाला भेट दिली. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर कौर यांनी डिचोली तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण क्षमतेने सुरू केली आहे. भाजपा सरकारच्या महिलांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना राज्यातील घराघरांत पोचवण्यात महिला मोर्चाची भुमिका मोठी आहे. प्रत्येक मतदान केंद्र पातळीवर महिला मोर्चाची समिती आहे. प्रचारात महिला मोर्चा नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतो. त्या तयारीचा आढावा रविवारी होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. महिला मोर्चाच्या राज्य प्रभारी सुलक्षणा सावंत आणि मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष शीतल नाईक यांनी या बैठकीची सारी तयारी पूर्ण केली असून राज्यभरातील भाजपाच्या महिला नेत्या या बैठकीत सहभागी होणार आहेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: