महाराष्ट्र

गणेशोत्सवाकरिता मोफत ‘मोदी’ एक्स्प्रेस

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करावं लागणार आहे.

“दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

१८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुटणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली असून प्रवासात एक वेळचं जेवणदेखील दिलं जाणार आहे.

बुकिंगसाठी प्रवाशांना नितेश राणे मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांचे क्रमांक दिले आहेत. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री व संतोष कानडे यांना २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबदरम्यान फोन करुन जागा आरक्षित करायची आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: