गोवा 

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आजपासून गोवा दौऱ्यावर

पणजी :
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा 23 आणि 24 जुलै रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा विशेष ठरणार आहे.

या दोन दिवसांच्या दौऱ्यात जेपी नड्डा यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष आणि गोवा प्रभारी सीटी रवी हेदेखील हजर असणार आहेत. यावेळी फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर भर देण्यात येणार आहे.

या दौऱ्याबद्दल बोलताना भाजप प्रदेशअध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, 12 आणि 13 जुलै रोजी दोन दिवस जे.पी.नड्डा गोव्याच्या दौऱ्यावर असणार होते , पण काही अपरिहार्य कारणाने हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आजपासून तो दौरा सुरु होणार आहे. यावेळी राज्यातील भाजप आमदारांसोबत त्यांची एक बैठक होणार असून मंत्री, आमदार आणि खासदारांसोबत एक बैठक; मंत्र्यांसोबत एक बैठक; पार्टीची कोअर टीम, भाजप प्रदेश पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, पक्षाच्या राज्यातील मोर्चांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस अशा विविध बैठका होणार आहेत. सोशल मीडिया सेल सोबत बैठकही ते घेणार आहेत.

6 महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर भाष्य करताना तानावडे म्हणाले, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वतःच्या बळावर जिंकून येणार हे 100 टक्के नक्की आहे. निवडणुका उद्या जरी घेण्यात आल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचप्रमाणे कुणाला तिकिट द्यायचं कुणाला नाही याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षाचं संसदीय मंडळ घेणार आहे. अजून निवडणुकांसाठी 6 महिन्यांचा अवकाश आहे. त्यामुळे उमेदवारांविषयी अजून तसं काही ठरलेलं नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: