गोवा 

‘आदरणीय पार्सेकर सर, आता आराम आणि व्यायाम करा’

पेडणे (प्रतिनिधी) :

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे वय झाले आहे. त्यानी मायक्रोस्कोप घेवून जर आपण साडेचार वर्षात केलेला विकास डोळ्यांनी दिसत नसेल तर त्यांनी त्यांचे मित्र डोळ्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आहे त्यांच्याकडून डोळे तपासून घ्यावे आणि मोठ्या चष्म्यातून विर्नोडा ते केरी पर्यंतचा विकास पाहावा. आणि सन्मानीय आदरणीय पार्सेकर सर आता पुढचीही साडेपाच वर्षे तुम्ही आराम आणि व्यायाम करा असा सल्ला मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेअरमन दयानंद सोपटे यांनी मांद्रे कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला .

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मागच्या दोन दिवसापूर्वी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे शिवाय आमदार दयानंद सोपटे यांनी साडेचार वर्षात काहीच विकास केला नसल्याने त्यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युतर देण्यासाठी आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब , सरचिटणीस सुदेश सावंत ,गोविंद आजगावकर आदी उपस्थित होते.

आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलताना भाजपाचे जेष्ठ आणि श्रेष्ट असे ज्यांनी भाजपचे दोन वेळा अध्यक्षपद भूषवले , राज्याचे मुख्यमंत्री झाले ते पार्सेकर सर भाजपच्या आमदारावर आपल्यावर कार्यपद्धतीवर टीका करतात त्याविषयी बोलण्याची गरज नाही परंतु ते सुशिक्षित पेशाने शिक्षक आहेत. स्वतः ला ज्ञानी समजतात. पण आता नाईलाजाने आपण बोलतो ते मुख्यमंत्री असताना त्यांचा पराभव झाला. जनतेचा कौल मान्य आहे कि नाहि हे माहित नाही , मात्र तेच म्हणतात कि साडे चार वर्षे आपण आराम आणि व्यायाम केला , तर मग पुढची साडे पाच वर्षेही आणखी आराम व्यायाम करण्याची गरज आहे . मांद्रे मतदार संघातील जनतेने आपला आमदार कसा असावा कसा निवडावा , त्यांनी कसे काम करावे ,त्याविषयी सोपटे याना निवडून आणले आहे , एकदाच नव्हे तर मांद्रे मधून दोनवेळा आमदार बनवले. आपण राजकारण करताना २४ वर्षे संपवली आहे . अनुभवाच्या माध्यमातून आपण आपण करतो, असे सोपटे यांनी यावेळी सांगितले.

आमदार सोपटे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना राजकारण हि सदैव चालणारी लोकशाहीतील प्रक्रिया ,आमदार होणे म्हणजे कुठे तरी पिढीजात भाटकारशाही नव्हे , किंवा मोफत मिळालेली काकांची भाटा जमीन नव्हे असा टोला मारला , राजकारणात आपणच शहाणा आणि आपल्याशिवाय दुसरा कुणीही नाही , आपणच गोव्याची बऱ्यापैकी कामे करू शकतो असे म्हणू नव्हे .

पर्रीकरांमुळे मी राजकारणात

सोपटे म्हणाले भाजपचे आदरणीय जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळे आपण राजकारणात आलो , त्यांच्याकडून खूप काही शिकायचे होते , पण नियतीला मान्य नव्हते . त्यांनी कधीच आम्हाला शिकवले नाही पार्टीत राहून , भाजपच्या आमदारावर मंत्र्यावर आणि पक्षावर टीका करायला कधी शिकवले नाही .

विकास दिसत नाही

साडेचार वर्षात केलेला विकास जर माजी मुख्यमंत्री पार्सेकर याना दिसत नसेल तर मला वाटते त्यांचे वय झाले आहे. आपण त्याला म्हातारा म्हणणार नाही तर जाणता म्हणू शकतो. बडबडला तरी तो जाणकार आहे. सुशिक्षित आहे , राजकारणाचे ज्ञान आहे , एका चष्माने दिसत नसेल तर जाड काचेचे चष्मा घालून आपल्यासोबत यावे आपण त्याला साडेचार वर्षाचा विकास दाखवतो असे आमदार सोपटे यांनी आवाहन केले.

पार्सेकरांच्या घरासमोर त्यांनी विकास बघावा

माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या जुन्या व नव्या घरासमोर जे नवीन मिनी पूल मुख्य रस्त्यावर आहेत ते आमदार सोपटे यांनी बांधले ते मुख्यमंत्री असतानाही त्याला जमले नाही ते आमदाराने करून दाखवले हा विकास त्याला त्याच्या समोर आहे तो दिसत नाही का असा सवाल सोपटे यांनी उपस्थित केला. त्याच्याच गावात त्यांनी फिरून पहावे रस्त्ये गटारे तिठा रस्ता नजरेला पडेल .

काकाने आणि त्यांनी आगर बळकावले

पार्सेकर यांनी व त्यांच्या काकाने मिळून गरिबांचे आगर बळकावले ,तिथला रस्ता प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली रस्ता जात असे तो त्याला १५ वर्षात जमला नसल्याचे सोपटे यांनी यावेळी टीका केली.

पार्सेकरांमुळे मला पक्ष सोडावा लागला

पार्सेकर यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला , ज्या २०१२ च्या निवडणुकीत मतदारसंघ फेररचना केली त्यावेळी पार्सेकर आपल्यावर वेगवेगळ्या माध्यमातून टीका करायचे आपल्याला राजकारणातून संपवण्याची भाषा बोलायचे. आपण मान्द्रेत आलो तर आपल्याला सोपटे पासून धोका आहे. त्या टीकेमुळे आपण मनाने नव्हे शरीराने भाजपा सोडला आणि पार्सेकर याना धडा शिकवला असा पुनरुच्चार सोपटे यांनी केला .

मंत्री मंत्र्याच्या सहकार्यातून विकास चालू आहे , मोरजी खिंड भाटीर संरक्षण भिंत पार्सेकर याना बांधता आली नाही , ओहळाची कामे , सुशोभीकरण हे पार्सेकर दिसत नाही का असा सवाल केला .

आदरणीय पार्सेकर सर

आमदार सोपटे यांनी पूर्ण पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पार्सेकर याना एकेरी शब्दात उल्लेख न करता आदरणीय सर असाच उल्लेख करत वेगवेगळ्या विचारलेल्या प्रश्नांना सोपटे यांनी उत्तरे दिली
पार्सेकर यांच्या म्हणण्यानुसार जर आपण केवळ उद्घाटने केली तर पार्सेकर यांचे दुर्भाग्य आपले सोभाग्य. ते मुख्यमंत्री असताना प्रकल्प का अर्धवट ठेवले . मोरजी खिंड प्रकल्प अर्धवट होता तो आपण पूर्ण केला , तुये हॉस्पिटल ५२ कोटी रुपये खर्च करून उभारले तिथे काय होते आताच्या आमदाराने काय केले तेही उघड्या डोळ्यांनी पहावे , तुये आयटी प्रकल्पाची केवळ जमीन संपादित केली होती , पुढे त्यांनी काहीच केले नाही , ते आपण काम आता मार्गी लावले . जर प्रकल्प पूर्ण केले असते तर मुख्यमंत्री असताना त्या कामाची प्रकल्पाची उद्घाटने का केली नाही असा सवाल सोपटे यांनी उपस्थित केला .

मनोहर पर्रीकर हे केंद्रात गेल्यावर त्या जागी पार्सेकर आले , राज्याचे पर्रीकर यांनी प्रकल्प हाती घेतले होते ते पार्सेकर यांनी पूर्ण करून त्यांची उद्घाटने केली , आपण कधी त्याना ती कामे पार्सेकर यांनी त्याची का उद्घाटने केली असे कधी म्हटले का .

जुनस पूल

पार्सेकर मुख्यमंत्री असताना अडीच कोटी खर्च करून पूल पायाभरणी केली केवळ पाटी लावली , ते काम कोणी केले असा सवाल सोपटे यांनी उपस्थित केला . तो पूल आता ऑक्टोबर महिन्यात आपण पूर्ण करणार ,आपण कधी कुणाच्या कामाचे श्रेय घेणार नाही , पर्यटन विकास महामंडळ मार्फत जी कामे सुरु आहेत ती त्यांनी पहावी असे सांगितले .

४५ कोटी खर्चून चांगला प्रकल्प आणणार

पर्यटन विकास महामंडळ मार्फत मांद्रे मतदार संघासाठी ४५ कोटी मंजूर झाले असून त्यातून मांद्रे जुनास वाडा येथे एक लाख चौरस मीटर जागेत बहुउदेषीय प्रकल्प उभारला जाणार आहे सनबन सारख्या मनोरंजन कार्यक्रमासाठी जागा शोधतात ती या प्रकल्पात उपलब्ध करण्याचा मनोदय व्यक्त केला .

विकासाचे प्रमाणपत्र पार्सेकर यांनी देवू नये ती जनता सरकार आणि पक्ष देतील ,त्यांची नीती बुद्धी आणि दृष्टी भ्रस्ट झाली आहे असा दावा सोपटे यांनी केला .

स्वतःची तिकीट स्वतः घोषित ?

पार्सेकर हे स्वत:ची तिकीट स्वतःच घोषित करत आहे. घोषित करत असताना दोन जिल्हा सदस्य रंगनाथ कलशावकार आणि सतीश शेटगावकर या दोघाना मंत्री नेत्यांकडे घेवून पार्सेकर जातात , मुख्यमंत्री जिल्हा पंचायत सदस्य सरपंच पार्सेकर सोबत असताना सोपटे यांनी साडे सतरा हजार मते कशी घेतली असा सवाल करून सोपटे यांनी संघटना तयार केली. काम केले विकास केला म्हणून सोपटे आमदार आहेत ,असे म्हटले .

खाण लीज नुतनीकरण प्रकरण न्यायालयात आहे त्याचा निकाल लागणार हेही पार्सेकर यांनी ध्यानात घ्यावे , स्कूलचे मैदान कसे उभारले तेही पार्सेकर यांनी जाहीर करावे , भाजपची उमेदवारी कुणाला ते पक्ष ठरवणार असे सोपटे म्हणाले .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: